पुणेविशेष

समर्थ पोलिस स्टेशनमध्ये स्वतंत्र सीसीटिव्हीकंट्रोल रूम

सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या विकास निधीतून १५० सीसीटिव्ही कॅमेरे

पुणे: आपल्या विकासनिधीतून समर्थ पोलिस स्टेशनच्या हद्दीत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी १५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून अद्यावत कंट्रोल रूम उभारण्यात आली आहे. याचे उद्घाटन पोलिस आयुक्त गुप्ता यांच्या हस्ते झाले. कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे, महापालिका आयुक्त विक्रमकुमार, सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर, वरिष्ठ पोलिस निरिक्षक विष्णू ताम्हाणे यांच्यासह पोलिस अधिकारी यावेळी उपस्थित होते. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे किती आवश्यक आहे, हे पोलिस अधिका-यांनी स्पष्ट केल्यानंतर तातडीने यासाठी विकास निधी उपलब्ध करून दिला आहे.यावेळी कार्यक्रमात चांगली कामगिरी केलेल्या पोलिस कर्मचारी, अधिकारी यांचा सत्कार उपस्थितांच्या हस्ते करण्यात आला.

या प्रकल्पाच्या माध्यमातून पोलिस स्टेशनच्या हद्दीत ६० ठिकाणी कॅमेरे, हॅस्पिटल, बसस्टँड, गणेश मंडळे, एटीएम सेंटरसह गर्दीच्या ठिकाणांना प्राधान्य, २४ चौक झाले कव्हर, एकूण ११ किलोमीटरचा भाग देखरेखीखाली, पालखी सोहळा, गणेशोत्सव काळत होणार विशेष उपयोग, कंट्रोल रूमचे नियंत्रण पोलिस आयुक्तालयातील मुख्य कंट्रोल रूमला जोडण्यात आले आहे.नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच पुणे शहर अधिक सुंदर होण्यासाठी पोलिस विभाग आणि महानगरपालिका यांनी एकत्रित येऊन काम करण्याची गरज आहे. समर्थ पोलिस स्टेशनच्या हद्दीत लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे आणि कंट्रोल रूम याचे उत्तम उदाहरण आहे. यापुढील काळात अशाच पद्धतीचे प्रकल्प उभे राहिले पाहिजेत, अशी अपेक्षा पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी व्यक्त केली.

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आला. वेगवेगळ्या ठिकाणी १५० कॅमेरे लावण्यात आले असून अद्यावत कंट्रोल रूम देखील उभारण्यात आलेली आहे. अशी व्यवस्था असलेले समर्थ पोलिस स्टेशन पहिलेच पोलिस स्टेशन ठरले आहे, याचा विशेष आनंद आहे. असे मत यावेळी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!