पुणेमहाराष्ट्रव्यवसायीक

पुण्यातील इन्स्टिट्युट ऑफ व्हॅल्युअर्सच्या संस्थेला भारतातील सर्वोत्कृष्ट शाखेचा पुरस्कार प्रदान

बंगळुरू येथे ५२व्या भारतीय मूल्यमापक काँग्रेसमध्ये पुणे शाखेला विशेष पुरस्कार

पुणे: आखिल भारतीय स्तरावर व्हॅल्युअर्सच्या स्तरावर कार्य करणाऱ्या इन्स्टिट्यूशन ऑफ व्हॅल्युअर्सच्या पुणे शाखेला यंदाचा सर्वोत्कृष्ट शाखा पुरस्कार मिळाला आहे.या पुरस्काराने बंगलोर येथे पुणे शाखेला सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार शाखेने सलग तिसऱ्यांदा मिळवून हॅटट्रिक केली आहे . आय.बी.बी.आय चे माजी अध्यक्ष श्री. साहू यांच्या हस्ते बंगळुरू येथे ५२व्या भारतीय मूल्यमापन काँग्रेस-२०२१ मध्ये ट्रॉफी आणि प्रमाणपत्राच्या स्वरूपात हा पुरस्कार इन्स्टिट्यूशन ऑफ व्हॅल्युअर्स च्या पुणे शाखेचे वतीने अध्यक्ष ए.व्ही. शेवडे यांना बेंगळुरू येथे प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार संपूर्ण भारतातील शाखांमधील एका शाखेला प्रामुख्याने सदस्यांच्या हिताचे व्यावसायिक विकास कार्यक्रम आयोजित करणे, आखिल भारतीय शिखर संस्थेने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन वेळेवर करणे आणि सदस्यांसाठी उपयुक्त कार्यक्रमांचे आयोजन करणे इत्यादी गोष्टींसाठी हा पुरस्कार दिला जातो.इन्स्टिट्यूट ऑफ व्हॅल्युअर्स, नवी दिल्ली, ही संपूर्ण भारतातील हॅल्युअर्सची प्रमुख संस्था असून मूल्यमापन क्षेत्रात ही संस्था अग्रणी आहे.

संपूर्ण भारतभर मूल्यमापन क्रियाकलापांना प्रोत्साहन देते, मूल्यमापन क्रियाकलापांना नियंत्रित करते आणि देखरेखही करते. सदर काँग्रेसमध्ये नितीन लेले, पुणे शाखेचे आय ओ व्ही चे केंद्रीय परिषद सदस्य, यांनी मूल्यनिर्धारण क्षेत्रातील नवीन संधी या विषयावर अतिशय उपयुक्त व्याख्यान दिले ज्याचे सर्व सहभागींनी खूप मोठ्या प्रमाणात कौतुक केले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!