Uncategorized

युवतीं साठी “क्वीन ऑफ महाराष्ट्र” राज्यस्तरीय व्यक्तिमत्व स्पर्धा

२२ डिसेंबर रोजी महाबळेश्वर येथे या स्पर्धेची अंतिम फेरी

पुण्यातील देवकी शहा आणि मिथिलेश घोलप यांच्या तर्फे १८ ते २८ वयोगटातील युवतीं साठी “क्वीन ऑफ महाराष्ट्र” राज्यस्तरीय संपन्न व्यक्तिमत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली असून येत्या २२ डिसेंबर रोजी महाबळेश्वर येथे या स्पर्धेची अंतिम फेरी पार पडणार असल्याचे आयोजकांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

या स्पर्धेत पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, मालवण इथून स्पर्धक सहभागी झाले होते. शहरा बरोबरच आसपासच्या ग्रामीण भागातून जवळपास साडे तीनशे युवतींनी या स्पर्धेत भाग घेतला. त्या पैकी प्राथमिक फेरी मधून १३८ स्पर्धक निवडले गेले. या स्पर्धकांमधे अजून काही फेऱ्या घेतल्या गेल्या असून त्यातून निवडल्या गेलेल्या ३२ स्पर्धकां पैकी सेमी फायनल आणि फायनल राऊन्ड मधून फक्त सोळा स्पर्धक अंतिम फेरी मधे सहभागी होऊ शकणार असल्याचे प्रसिद्ध फॅशन शो दिग्दर्शक चैतन्य गोखले यांनी सांगितले.

सर्व स्पर्धकांना अंतिम फेरीत विजयी होण्याच्या दृष्टीने तयार करण्याचे काम गोखले करणार असून या मधे शिष्टाचार, विविध व्यक्तिमत्वा नुसार रंगभूषा आणि वेशभूषा, हावभाव, रँपवर चालणे, स्वपरीचय इत्यादी बाबींवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सध्याच्या कोविडच्या पार्श्वभूमी वर सरकारी नियमांचे पालन करून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असल्या मुळे या स्पर्धेतील विजेत्यांना संस्थेनी निर्मित केलेल्या चित्रपटामध्ये संधी दिली जाणार असल्याचे देवकी शहा आणि मिथिलेश घोलप यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!