पुणेमनोरंजनमहाराष्ट्रव्यवसायीक

Festiva Events तर्फे 3 दिवसीय ‘क्रिसमस शॉपिंग फेस्टिवल’

पुणेकर ग्राहकांसाठी महाराष्ट्रभरातून वैविध्यपूर्ण ५० हून अधिक स्टॉल

औंध, पुणे: छोट्या व महिला व्यावसायिकांना विक्रीचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी Festiva Events तर्फे २४ ते २६ डिसेंबर २०२१ या कालावधीत आयोजित तीन दिवसीय ‘क्रिसमस शॉपिंग फेस्टिवल’ प्रदर्शनाचे आयोजन सुनंदा ताकमोघे व वैशाली मीरकुटे यांनी केले आहे. पुणे औंध येथील गायकवाड पेट्रोल पंपांसमोरील पटांगणामध्ये २६ डिसेंबर पर्यंत सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.

ग्राहकांसाठी ‘क्रिसमस शॉपिंग फेस्टिवल’ मध्ये महाराष्ट्रभरातून चवदार खाद्यपदार्थ, गृहसजावटीच्या वस्तू, हस्तकला, रेडिमेड, गरम कपडे, डिझायनर ड्रेसेस, हर्बल प्रॉडक्ट्स, आयुर्वेदिक औषधे, अत्तरे, परफ्युम, हॅण्डमेड दागिने, पेपर क्विलिंग, फ्रिज मॅग्नेट, अॅक्रॅलिक गिफ्ट आर्टिकल, बॅग, सुंगधी उदबत्त्या, लाईट वेट पर्स, चंदेरी कलमकारी, आकर्षक नक्षीकाम केलेले ड्रेस, वेगवेळ्या चवीची सरबते, नाचणी, तीळ, शेंगदाण्याचे लाडू, उपवास खाकरा, लहानांसाठी खेळणी असे वैविध्यपूर्ण ५० हून अधिक स्टॉल येथे आहेत. अशी माहिती इव्हेंट्सच्या संचालीका सुनंदा ताकमोघे यांनी दिली.

सुनंदा ताकमोघे म्हणाल्या, महिला सक्षमीकरणासाठी व त्यांना उत्तम व्यवसायीक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. ग्राहकांना महाराष्ट्रातील विविध पदार्थ एकाच छताखाली, एकाच वेळी कशे उपलब्ध करून देता येतील या साठी प्रयत्न करीत आहोत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!