मराठी साहित्य परंपरेतील एक क्रांतिकारी कवी म्हणजे नामदेव ढसाळ
इयत्ता १ली ते १०वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळोपयोगी वस्तूंचे वाटप

पुणे: निधड्या छातीचा राजकीय नेता म्हणजे नामदेव ढसाळ. तरुणांसाठी दीपस्तंभासारखे व्यक्तिमत्त्व म्हणजे नामदेव ढसाळ. साठी च्या दशकातला तो एक असा कवी होता, की ज्याने मराठी साहित्यातील कवितेला एक नवे परिमाण मिळवून दिले. ‘दलित पॅंथर’चे संस्थापक-अध्यक्ष नामदेवराव ढसाळ यांच्या 8 व्या स्मृतिदिनानिमित्त सामान्यांच्या मनात विद्रोहाच्या मशाली पेटवणारे नामदेव दादा ढसाळथोडक्यात नामदेव दादा ढसाळबद्दल प्रेमाचे शब्द, स्नेहाचा स्पर्श आपुलकीची नजर, कौतुकाची थाप सदैव मदतीचा हात, असे आहेत आमचे आदरणीय वंदनीय नामदेव दादा ढसाळ खासत्यांनी १९७२ साली त्यांच्या सहकाऱ्यांच्या व साहित्यिकांच्या सहकार्याने दलित पॅन्थर ह्या आक्रमक संस्थेची स्थापना केली.
त्यांच्या ह्या संघटनेवर अमेरिकेतील ब्लॅक पॅन्थर ह्या चळवळीचा प्रभाव होता. त्यांच्या स्मूर्तीदिनानिमित्त दलित पॅंथर व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या विध्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे शुभारंभ पुणे कॅंटॉन्मेंट बोर्डचे आमदार सुनीलभाऊ कांबळे व पंचशील वेलफेर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष इरण्णाजी नडगम यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी, पुणे कॅंटॉन्मेंट बोर्ड उपाध्यक्ष सचिन मथुरावाला, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे पुणे शहराध्यक्ष शैलेंद्रजी चव्हाण, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष नीलेशभाऊ अल्हाट, पश्चिम महाराष्ट्रमा. शामराव गायकवाड, भिम छावा संस्थापक अध्यक्ष, सरचिटणीस असीतजी गांगुर्डे, PWA खजिनदार संजय कांबळे सर, दलित पॅंथर केंद्रीय कोषाध्यक्ष श्रीकांतदादा लोणारे, युवक अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश संतोषदादा गायकवाड, मुंबई प्रदेश अध्यक्ष प्रताप रावत, पुणे शहराध्यक्ष सनी पंजाबी, अमोल पवार सातारा जिल्हाध्यक्ष लखन मिसाळ इंदापूर तालुकाध्यक्ष यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मान्यवरांनी पद्मश्री नामदेव दादा ढसाळ यांना अभिवादन करून दादांच्या विचारांचा आणि कार्याचा गाडा जोमाने पुढे घेऊन जाऊ अशी शपथ घेण्यात आली.यावेळी दलित पॅंथर राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय यशवंतभाऊ नडगम यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.