पुणे :14 फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण जगात व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो भारतातही तो मोठया प्रमाणावर साजरा केल्याचे दिसून येते. त्याच अनुषंगाने व्हॅलेंटाईन डे च्या पूर्वसंध्येलाच 13 फेब्रुवारी रोजी वी पुणेकर संस्थेमार्फत पुण्यातील नदीपात्रातील विविध घाटात नदीच प्रदूषण थांबविण्यासाठी नदी पात्रातील कचरा बाहेर काढण्यासाठी ‘थांबा आणि विचार करा पिण्याचं पाणी वाचविण्यासाठी my river my valentine हा उपक्रम 10 ठिकाणी साजरा करण्यात येणार असल्याची माहिती वी पुणेकर संस्थेच्या आम्रपाली चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या उपक्रमात पुण्यातील सुमारे 80 महाविदयालयातील तरुणाई व नागरिक सहभागी होणार आहेत. यात स्वयंसेवक देखील सामील होणार असून नदी स्वच्छ करण्याबरोबरच नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी जनजागृती देखील करण्यात येणार आहे वी पुणेकर संस्थेमार्फत एक अजेंडा तयार करण्यात आला आहे. त्यासाठी नियोजित घाट विभाग करण्यात आले असून नदी स्वच्छतेसाठी किट वाटप करून नदी स्वच्छता अभियान देखील राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम राबविल्याने पुण्यातील नद्या स्वच्छ होणार असून नदीचे प्रदूषण देखील रोखले जाणार आहे यामुळे रसायन मिश्रित पाणी कमी होणार असून पाण्यातील ऑक्सिजन पातळी समतोल राहणार आहे.
रविवारी दिनांक 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.00 वाजता कार्यक्रमाची सुरुवात होणार असून अनेक मान्यवर उपस्थिती लावणार आहेत.पुण्यातील नदीतीरावरील ब्रिज व घाटच्या बाजूला अभियान राबविण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेला वी पुणेकर संस्थेच्या आम्रपाली चव्हाण निलेश जंजिरे, स्वप्निल पवार, चंकी पांडे, समीर पौलस्ते व दत्ता बालशंकर उपस्थित राहणार आहेत.आणि पुणे महानगरपालिकेच्या वतीने डॉ केतकी घाटगे असिस्टंट हेल्थ ऑफिसर उपस्थित राहणार आहेत.