रोड मराठा समाज शिष्टमंडळाने घेतली ना.डॉ.नीलमताई गोऱ्हे यांची भेट
“पानीपत येथील स्मारकाची दुरवस्था दूर करणार”. मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे,आदित्य ठाकरे,ओमप्रकाश बिर्ला यांचे सहकार्य
पुणे: पानीपत येथे झालेल्या युद्धानंतर तेथेच स्थायिक झालेल्या रोड मराठा समुदायाच्या शिष्टमंडळाने विधानपरिषद उपाध्यक्ष ना.डॉ.नीलमताई गो-हे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यांनी पानीपत येथील मराठा स्मारकाची दुरवस्था पुरातत्व खात्याने केली आहे, ती दूर करावी अशी मागणी केली. सदाशिवभाऊ पेशवे यांचा पुतळा उभरवा हरियाणा राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थापन करावा. ग्रंथालय व अन्य बाबींच्या मागणी केली.
डॉ. गोर्हे यांनी या विषयात योग्य ती कार्यवाही मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,लोकसभा सभापति ओमप्रकाश बिर्ला यांच्या सहाय्याने करण्यात येईल असे संगितले.तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारानुसार महाराष्ट्रातील मराठी बांधव आणि हरियाणा व तेथे स्थायिक बांधव यांचा संपर्क स्थापित करण्यात येईल असे प्रतिपादन केले.या प्रसंगी रोड मराठा समाजाचे धुरीण कमलजीत महाले,सुरेंदर दाभाडे,मा.आ.चंद्र्कांत मोकाटे.विराज तावरे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचा सत्कार डॉ.गो-हे यांनी केला.