मुंबई: नोव्हेल इन्स्टिट्युटस् पुणे चे अध्यक्ष अमित गोरखे यांना कर्तव्यम सोशल फाउंडेशन,महाराष्ट्र यांच्या वतीने कर्तव्यम प्रेरणा पुरस्कार २०२२, राज्याचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे प्रदान करण्यात आला.अमित गोरखे यांनी कोरोना काळात केलेली मदत,नोव्हेल शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून आज पर्यंत केलेले शैक्षणिक काम तसेच कलारंग सांस्कृतिक संस्थेच्या माध्यमातून आजवर सांस्कृतिक क्षेत्रात दिलेले योगदान या कामासाठी हा पुरस्कार त्यांना दिला गेला.
सामाजिक कामात ते नेहमी अग्रेसर असतात, राजकारण बाजूला ठेवून समाजाच्या हितासाठी नेहमी ते धावून जातात महाराष्ट्रभर त्यांचे काम जोमाने सुरू आहे.ते भाजपा चे प्रदेश सचिव आहेत,या आधी 2012 साली भारत सरकारचा राष्ट्रीय युवा पुरस्कार तत्कालीन राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना मिळालेला आहे.कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष श्री संतोष बारणे यांनी सर्वांचे स्वागत केले.
राज्यपाल महोदय आपल्या भाषणात म्हणाले विवध क्षेत्रात काम करीत असताना कामात आणखी प्रेरणा मिळण्यासाठी पुरस्कार टॉनिक चे काम करतो आणि त्यामुळे आणखी जोमाने माणूस काम करतो.कोरांना काळात अनेकांनी प्रचंड काम केले परंतु सर्वात मोठी जबाबदारी ही डॉक्टरांनी पार पाडली या काळात आपल्या आईकडे मुलगा जाऊ शकत नव्हता, नवऱ्याकडे, बायको, मुल जाऊ शकत नव्हती, इच्छा असूनही आपल्या आईबाबांकडे त्यांना कोरोना असल्यामुळे मुलं जाऊ शकत नव्हती, पण त्याच काळात अत्यंत जोखमीने डॉक्टर्स आणि नर्सेस ने जबाबदारीने काम केले व प्रत्येकाच्या जवळ जाऊन त्यांना मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले, त्यामुळे अशा सर्व कोरोना योद्ध्यांचे मी कौतुक करतो. यावेळी शुभाष सिक्रेट या पुस्तकाच्या २१ व्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले.
या वेळी महाराष्ट्र तील विवीध क्षेत्रातील २५ जनाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.श्री क्रांती महाजन यांनी आभार मानले.