अद्ययावत उत्पादन आणि ऑटोमेशन तंत्रज्ञान केंद्र स्थापनकरण्यासाठी विप्रो पारीचा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोबत सामंजस्य करार
पुणे: रोबोटिक्स, मेकॅट्रॉनिक सिस्टीम, प्रगत सेन्सरी सिस्टीम आणि इंडस्ट्री ४.० सह स्मार्ट फॅक्टरी यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऑटोमेटेड मॅन्युफॅक्चरिंग सिस्टीम सोल्युशन्समध्ये जागतिक स्तरावर आघाडीवर असलेली कंपनी विप्रो पारी आणि कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे (सीओर्इपी) यांच्यात अद्ययावत उत्पादन व ऑटोमेशन तंत्रज्ञान केंद्र आणि रोबोटिक्स व ऑटोमेशन प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार (एमओयू) झाला. या करारावर स्वाक्षरी झाल्याची घोषणा मंगळवारी करण्यात आली. यावेळी विप्रो पारीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतीक कुमार , व्यवस्थापकीय संचालक रणजित दाते , रवी गोगिया , सीईओपीच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष प्रताप पवार , संचालक डॉ . बी.बी. अहुजा व विप्रो पारीचे व्यवस्थापनातील वरिष्ठ उपस्थित होते.
या सामंजस्य करारांतर्गत,विप्रो पारी कंपनीसीओर्इपीच्या मॅन्युफॅक्चरिंग सायन्सेस इमारतीतील नवीन इमारतीचे प्रायोजकत्व करेल.ही इमारत दोनमजल्यांची असेल. त्यात तळमजल्यावर मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी लॅब, शैक्षणिक वर्ग,संगणकप्रयोगशाळा असेल तर दोन्ही मजल्यांवर कार्यालये असतील. या इमारतीचे नाव “विप्रो पारीसेंटर फॉर अॅडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी” असे असणार आहे याव्यतिरिक्त, विप्रो पारीरोबोटिक्स आणि ऑटोमेशन ऍप्लिकेशन्सवर केंद्रित असलेल्या एकात्मिक उत्पादनप्रयोगशाळेच्या स्थापनेला समर्थन देईल.
विप्रो पारी संस्थापक मंगेश काळे यांच्यासन्मानार्थ या प्रयोगशाळेला “मंगेश काळे रोबोटिक्स अँडऑटोमेशन लॅब” असे नाव दिले जाईल. या केंद्राद्वारे, विप्रो पारी उत्पादन तंत्रज्ञानाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करणाराअभ्यासक्रम आणि प्रयोगशाळा तयार करण्यात मदत करेल. प्रकल्प आणि कारखानाभेटीद्वारे प्राध्यापक आणि विद्यार्थी त्यात सहभागी होवू शकतील. या सामंजस्य कराराबाबत विप्रोइन्फ्रास्ट्रक्चर इंजिनिअरिंग’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतीक कुमार म्हणाले की विद्यार्थ्यांना उत्पादन क्षेत्रात अग्रेसर म्हणून विकसितकरण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी उत्कृष्टता केंद्रेआणि प्रयोगशाळा स्थापन करणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनापुरेशा संधी मिळतील. यासाठी सीओर्इपीसोबत भागीदारीकरताना आम्हाला आनंद होत आहे.
विप्रो पारीचे व्यवस्थापकीयसंचालक रणजित दाते म्हणाले की मी स्वतः सीओर्इपी चा माजीविद्यार्थी आहे. आमच्या अभियांत्रिकी प्रतिभेला इतके आवश्यक ज्ञानदेण्यासाठी आणि प्रगत उत्पादन तंत्रज्ञानाला तरुण अभियंत्यांसाठी करिअरची निवडकरण्यात मदत करण्यासाठी आमच्या संस्थेशी भागीदारी केल्याचा मला अभिमान आहे सीओईपीच्या प्रशासकीयमंडळाचे अध्यक्ष प्रतापराव पवार म्हणाले की आम्ही उद्योग आणि इतरशैक्षणिक संस्थांच्या सहकार्यातून सीओर्इपीला नवीन उंचीवर नेत आहोत. सीओईपीचे संचालक डॉ.बी. बी. आहुजा म्हणाले की वर्तमान, अत्याधुनिक आणिभविष्यकालीन अभ्यासक्रम, सुविधा आणि संशोधनाची खात्री करण्यासाठी सीओर्इपी नेहमीउद्योगाशी सहयोग करण्यास उत्सुक आहे. या सामंजस्य करारामुळे आम्हाला विप्रो पारी याक्षेत्रातील जागतिक कंपनी सोबत भागीदारीकरण्याची संधी मिळते.”