चोरगे दांपत्याच्या विचार आणि कष्टातून उभा राहिला ‘एस. पी. बिर्याणी’ व हॉटेल निसर्गाचा’ वटवृक्ष
पुणे: हॉटेल व्यवस्थापक पदावरील नोकरी सोडल्यानंतर काय करावे हा खरतर मोठा प्रश्न आमच्या समोर होता. हॉटेल व्यवस्थापनाचा अनुभव श्री जवाहर चोरगे यांना असल्याने आणि सौ. चंद्रलेखा जवाहर चोरगे यांना मांसाहाराचे पदार्थ उत्तम बनवता येत असल्याने आपण नॉनव्हेज हॉटेल टाकूया असा विचार चोरगे यांनी केला आणि प्रायोगिक तत्त्वावर १९९३ मध्ये पुण्यातील सदाशिव पेठेत एस. पी. बिर्याणी सुरूवात एका भाड्याच्या जागेत झाली.
कष्ट करणाऱ्या व्यक्तीला आणि ग्राहकांना प्रामाणिक सेवा देण्याच्या वृत्तीला यश हे नक्की मिळात आणि ते यश चोरगे दांपत्याला देखील मिळाले. आज एस. पी. बिर्याणी हाऊस आणि निसर्ग सी फुड या दोन्ही ठिकाणी पुणेकर व महाराष्ट्रातील विविध भागातील खवय्ये, सिनेसृष्टीतील कलाकार आवर्जून आस्वाद घेण्यासाठी येत असतात. फीश साठी निसर्गचे नाव आहे इथे रोज ताजे मासे मुंबई वरून येतात त्यामुळे चवीत फरक कधीही पडत नाही. रोप्य महोत्सवानिमित्त प्रसिद्ध अभिनेते अमीर खान आणि जगप्रसिद्ध संगीतकार अजय अतुल यांनी देखील एस.पी बिर्याणीला भेट देऊन आस्वाद घेतला होता व शुभेच्छा दिल्या. पुढे जाणाऱ्या माणसाचे पाय ओढायचा प्रयत्न काही लोक करत असतात आणि असे प्रसंग यांच्या समोर देखील आले. किंतु त्या काळात धीर न सोडता परिस्थितीला तोंड देण्याची शक्ती स्वामींच्या आशिर्वादाने लाभली आणि ते षडयंत्र टळले.
देव माणसाला कोणत्याही रूपात व कोणत्याही ठीकाणी भेटू शकतो त्यामुळे माणुसकीचे दर्शन आपल्या आचरणातून आणि वागणुकीतून घडायला हवेत. निसर्ग हॉटेल आगेत जळून राख झाल्यानंतर आभाळ कोसळण्यासारखा प्रसंग चंद्रलेखा चोरगे यांच्यावर आला. त्यावेळी मदतीला धावून आलेल्या त्यांच्या हितचिंतकांचे आभार शब्दात व्यक्त करता येणार नाही. यामध्ये सौ चंद्रलेखा यांचे म्हेवणे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विषेश सहकार्याने हा व्यवसाय पुन्हा उभा करता आला यासाठी सदैव त्यांचे ऋण देखील ते मानतात. सोबतच बहीण श्रीमती जयश्री चंद्रकांत थिटे यांची देखील साथ देखील मोलाची होती. राष्ट्रपती पदक विजेते, सहायक पोलीस आयुक्त मारूतीराव जाधव यांची कन्या सौ. चोरगे आहेत. स्वामींच्या आशिर्वादाने चंद्रलेखा चोरगे गरजूंना शक्यतो प्रमाणात मदत करण्यासाठी तैयार असताच मठाच्या माध्यमातून दरमाही अन्नदानातून सेवा त्या करत असतात. लॉकडाऊनच्या काळात देखील होईल तितकी मदत करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. एकही कर्मचारी कामावरून कमी न करता कुटुंबा प्रमाणे त्यांच्यासोबत राहून त्या वेळेचा सामना त्यानी सर्वांनी केला. हे करत असतांना मुलांवर चांगले संस्कार झाले त्यात मोठी मुलगी वकील झाली व आयकर आयुक्त संदीप साठे यांच्या सोबत तीचा विवाह झाला. मुलगा हर्षवर्धन चोरगे हॉटेल मॅनेजमेंटची पदवी घेऊन या व्यवसायात लक्ष घालून काम करत आहे. त्यामुळे मुलांवर केलेले संस्कार नावारूपाला यायला लागले यांचा अभिमान चंद्रलेखा यांना वाटतो.
श्री जवाहर चोरगे आणि सौ. चंद्रलेखा जवाहर चोरगे यांच्या प्रवासात अनेक चड-उताराची स्थीती आली त्यांतून स्वतःला सिद्ध करून स्वकर्तृत्वच त्यांना यशाच्या शिखरावर घेऊन गेलं आहे. एसपी’ज ला ‘बिर्याणी फेस्टीवल’ तर, निसर्गला ‘क्रॅब फेस्टीवल’ दरवर्षी केला जातो त्याला उत्तम प्रतिसाद ग्राहक नेहमी देतात. पुण्यातील एका एका लहानशा खोलीत सुरू झालेल्या या हॉटेलचा प्रवास एक नावाजलेला ब्रँड बनून, संपूर्ण हॉटेल बाजारपेठेत आज स्वतःचं वेगळं अस्तित्व आणि भक्कम स्थान निर्माण करण्यात चोरगे दाम्पत्य यशस्वी झाले आहे.