सिंहगड रोड हिंगणे खुर्द परिसरामध्ये ॲड.प्रसन्नदादा जगताप आणि त्यांच्या पत्नी सौ.वृंदा प्रसन्न जगताप यांच्या वतीने आज ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सिंहगड रोड परिसरातील विविध क्षेत्रातील महिलांचा यथोचित सन्मान केला. यामध्ये कला, चित्रपट, डॉक्टर्स, इंजिनिअर, वकील, आयटीमध्ये कार्यरत असलेल्या महिला भगिनींचे पुष्पगुच्छ, पुस्तके व ट्रॉफी देऊन स्वागत आणि सत्कार करण्यात आला.
यावेळी उभयतांनी उपस्थित महिला भगिनींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध खेळ व कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते. त्यात देखील या महिलांनी उस्फूर्तपणे सहभागी होऊन त्याचा आनंद घेतला. तसेच याप्रसंगी उपस्थित महिला भगिनींनी आपापले विचार अगदी मनमोकळेपणाने व्यक्त केले.
मागील दोन वर्षात कोरोना काळामुळे त्यांना कुठल्याही कार्यक्रमात सहभागी होता आले नव्हते परंतु आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सौ. वृंदा प्रसन्न जगताप यांनी सिंहगड रोड परिसरातील सर्व महिला भगिनींसाठी एक अतिशय चांगला उपक्रम राबविल्यामुळे सर्व महिलांनी त्यात सहभागी होऊन त्याचा आनंद घेतला. यावेळी त्यांच्यासाठी चहापानाची देखील चोख व्यवस्था करण्यात आली होती.