कल्पना थोरवे यांच्या नेतृत्वाखाली कात्रज परिसरात महागाईचा निषेध

शिवसेना संपर्क कार्यालय कात्रज येथील प्रभाग क्रमांक 58 (गोकुळ नगर- कात्रज ) च्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात महागाई विरोधी आन्दोलन कात्रज संतोष नगर येथील सच्चाई माता राजगड- कॉलनी येथे घेण्यात आले .त्यावेळेला या भागातील शेकडो शिवसैनिक व परिसरातील अनेक नागरिक विशेषता महिला उपस्थित होत्या. शिवसेनेच्यl कल्पनाताई थोरवे (शहर संघटिका व माजी नगरसेविका पुणे मनपा) यांच्या वतीने घेण्यात आले यावेळेला केंद्र शासनाच्या विरोधात घोषणा देऊन केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला..
यावेळेला कल्पना थोरवे यांनी उपस्थित आंदोलकांना समोर महागाईचा भस्मासुर या मथळ्याखाली आज आपल्या देशाची महागाई कशा प्रकारे वाढत आहे याकडे विचार केला तर याला कारणीभूत केंद्र सरकार जबाबदार आहे मात्र केंद्र सरकार महागाईचा भस्मासुर रोखण्यासाठी आपण अपयशी ठरलो असून हे अपयश झाकण्यासाठी देशामध्ये वेगवेगळ्या सत्ता नसलेल्या राज्यांमध्ये सीबीआय व ईडी इन्कम टॅक्स सल्स टॅक्स सर्विस टॅक्स यासारख्या कर आकारण्या यासारख्या तपास यंत्रणांना हाताशी धरून खोट्या खोट्या धाडी टाकून त्याबाबत सोशल मीडिया व न्यूज चॅनेल व प्रेस यांना हाताशी धरून जनतेमध्ये आपण किती चांगले काम करतोय याचा लेखाजोखा रोजच्या रोज मांडला जातोय मात्र महागाई आणि दरवाढ याकडे लोकांचे जनतेचे लक्ष जाणार नाही याची मात्र कमालीची यंत्रणा वापरत आहे.. मुळे सर्वसामान्य जनतेला जीवन जगणे कठीण होऊ लागलेली आहे आहे म्हणून आज कात्रज येथील सच्चाई माता व संतोषीमाता या देवीला साकडे घालून महागाई कमी व्हावी व देशाचे पंतप्रधान भाजप सरकार यांना चांगली सुबुद्धी देवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करण्यात आली..
भाजपा सरकार नाही व आपल्या देशाचे पंतप्रधान त्यांनी वेळीच माघारी रोखली नाही तर तर भविष्यात भारताची श्रीलंका व्हायला वेळ लागणार नाही त्यामुळे देशाने प्रथम महागाई कमी करून जनतेला विश्वास देऊन चांगले कार्य करावे महाराष्ट्र राज्यामध्ये जो काही राज्य मिळवण्यासाठी चुकीचा कार्यक्रम लावलेला आहे तो कार्यक्रम रद्द होऊन महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला चांगले कार्य करण्यासाठी समर्थन करावे नाहीतर भविष्यात भाजप सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही यात तीळमात्र शंका नाही..कार्यक्रमाचे नियोजन आल्पना पवार. व गीतांजली जाधव यांनी केले आंदोलनास सुशीला वर्पे मालनबाई भराडे दीप्ती शेळके छाया वाघमोडे प्रमिला गुगळे अनिता बंडे सह शेकडो महिला उपस्थित होत्या.
यावेळेला कल्पना थोरवे यांनी उपस्थित नागरिकांसमोर महागाईचा भस्मासुर आज आपल्या देशाची महागाई कशा प्रकारे वाढत आहे याकडे दुर्लक्ष होण्यासाठी व जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी केंद्र सरकार चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियावर चुकीच्या आणि खोट्या बातम्या पसरवून आवश्यक नसतानाही इडी सीबीआय यांना हाताशी धरून महाराष्ट्र मध्ये कारला कोंडीत पकडून सरकार कसे डळमळीत होईल यासाठी नको त्या गोष्टी मध्ये इंटरेस्ट घेऊन लोकांची दिशाभूल चालवले मी आहे यामुळे आत्ता जी महागाई वाढलेली आहे.. लोकांना रोजगार मिळत नाही याकडे जनतेचे दुर्लक्ष होऊन आपण किती चांगले काम करत आहोत असे देखाव्याचे काम केंद्र सरकार करत आहे यामुळे महाराष्ट्र सरकारला कोंडीत पकडून सत्ता कशी मिळेल याकडे भाजपा सरकार काम करत आहे त्यामुळे आम्हाला नागरिकांची जनतेची दिशाभूल होऊ नये केंद्र सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन घ्यावे लागत आहे गेल्या अनेक दिवसापासून पेट्रोल डिझेल गॅस तेल रेशन डाळी यासारखी जीवनावश्यक गरज असलेल्या गोष्टींमध्ये सर्रास वाढ होते मात्र केंद्र सरकार जीएसटी , इन्कम टॅक्स , सर्विस टॅक्स अशा अनेक माध्यमातून प्रत्येक वस्तू वरती जाचक कर लावून वस्तूच्या किमती वाढवत राहिलेल्या आहेत अशा जर घटना घडत राहिल्या ही दरवाढ होत राहील आली तर नागरिकांना जीवन जगणे असह्य होईल यदाकदाचित यावर भारत सरकारने जर कंट्रोलिंग केली नाही तर भारताचा श्रीलंका व्हायला वेळ लागणार नाही.. तरी आमच्या देशाच्या पंतप्रधानांना सुबुद्धी देवो दरवाडी कडे लक्ष देऊन विनाकारण महाराष्ट्राचा खेळ खंडोबा चालू आहे तो थांबवावा.. अशी आई जगदंबे ला माझी प्रार्थना आहे..म्हणून आज आम्हाला अनेक शिवसैनिकांना सोबत घेवून या ठिकाणी आणि निषेध आंदोलन घ्यावे लागत आहे.. अशी आंदोलने पुणे शहरात पुणे शहर शिवसेनेच्या वतीने अनेक ठिकाणी घेतलेली आहेत.. कामाचे नियोजन गीतांजली जाधव ,अल्पना पवार, यांनी केले व आंदोलन यशस्वी होण्यासाठी सुशीला वर्पे, मालन ताई भराडे ,दीप्ती शेळके ,छाया वाघमोडे ,परमिला गुगळे ,आणि अनिता बंडे सह वसीम खान ,राकेश कोळेकर ,रामेश्वर बिराजदार ,सागर रानगावकर, महेश ननावरे, पांडुरंग मनसेकर शिवसेनेचे विभाग प्रमुख सचिन मोहिते, अभिजीत शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडले.. कार्यक्रमाचे आयोजन एडवोकेट संभाजी थोरवे व शहर संघटिका कल्पना थोरवे यांनी केले.