बुद्ध पौर्णिमेनिमित्त लामा फेरा मॉनेस्ट्री मध्ये बोधीसत्वाचे धडे

पुणे: सिद्धार्थ से बुद्ध बनल्यामुळे बौद्ध पोर्णिमेचे महत्त्व अधिक आहे. बुद्ध निळ्या रंगाच्या झेंड्यापुर्ते मर्यादित नसून त्यांची शिकवण मनवधर्माला प्रेरणा देणारी आहे. स्वतःला ओळखने, स्वतःच्या जिवनाचे लक्ष आत्मसात करून सामाजिक भान ठेवण्याची शिकवण भ. बुद्धांनी दिली. माझी पुजा करू नका जो स्वतःसाठी जगतो तो मनुष्य; दुसऱ्यासाठी जगणारे माझ्यासाठी सर्व बुद्ध आहे हीच शिकवण आजच्या बुद्ध अनुयायांमध्ये गरजेची आहे असे संबोधन डॉ. सत्येंद्र शुक्ला यांनी बुद्ध पौर्णिमे निमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
इंटरनॅशनल लामा फेरा हिलिंग ऑण्ड ट्रेनिंग रिसर्च सेंटर व लामा फेरा फाउंडेशन यांच्या वतीने भारतातील सर्वात मोठ्या लामा फेरा हिलिंग मॉनेस्ट्री मध्ये भगवान बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. लामा फेरा हिलिंग गुरू, लामा डॉ. सत्येंद्र शुक्ला यांच्या हस्ते भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेचे पुजन करून उपस्थित अनुयायांना त्यांनी संबोधीत केले. भ. बुद्धांनी जगला जे तत्त्वज्ञान दिले त्याची आवश्यकता आजच्या आधुनिक विज्ञानाच्या काळात प्रत्येक जनमानसाला आहे. आज बुद्ध पोर्णिमेच्या निमित्ताने लामा फेरा मॉनेस्ट्री मध्ये सर्व अनुयायांनी बुद्धांना वंदन करून महाबोधी ध्यान, लामा फेरा हिलिंग व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
यंदाच्या वर्षी बुद्ध पोर्णिमेच्या निमीत्ताने विविध क्षेत्रात सामाजिक योगदान देणाऱ्या व्यक्तीचा सन्मान देखिल करण्यात आला. यामध्ये आर्किटेक्चर झोहेर सियामवाला, बांधकाम व्यावसायिक सचिन तरवडे, पत्रकार सुमीत अंबेकर, आपल्या हिलिगंच्या द्वारे अनेकांना बळ देणार्या लामा रेवती दामोदरे, आनंदी सुंदरराजन, कविता टकले, निलेश महाडिक, मानसी कठाले, कार्तिकी काळभोर, नेहा गोयल, स्नेहा देवरे, राजेश्वरी रमेश या बारा मान्यवरांना पीस मेसेंजर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.