आरोग्यमहाराष्ट्रविशेषव्यवसायीक

एक्स्प्लोर लाईफस्टाईल आणि इस्रायली तंत्रज्ञान कंपनीची भागीदारीजगातील पहिले मेडिकल ग्रेड आणि वेयरेबल, सतत मॉनिटरिंग करणारे घड्याळाच्या स्वरूपातील मेडिकल डिव्हाईस लॉन्च

कार्डियाकसेन्स: अऱ्हिथमिया किंवा हृदयाचे ठोके अनियमित असलेल्या रुग्णांसाठी वरदान ठरणार ·

रुग्णांच्या तब्येतीवर देखरेख ठेवण्याकरिता आवश्यक अशी अत्याधुनिक सोल्युशन्स सादर करणारी कंपनी एक्स्प्लोर लाईफस्टाईलने कार्डियाकसेन्स हे जगातील पहिले मेडिकल ग्रेड आणि वेयरेबल, सतत मॉनिटरिंग करत राहण्याची क्षमता असलेले डिव्हाईस घड्याळाच्या स्वरूपात लॉन्च करण्यासाठी एका इस्रायली कंपनीसोबत भागीदारी केली आहे. · कार्डियाकसेन्स डिव्हाईस ईयू एमडीआर तर्फे क्लिनिकली सिद्ध झालेले आणि मान्यताप्राप्त मेडिकल डिव्हाईस असून याला ईयू एमडीआर व सीई २७९७ सर्टिफिकेशन्स मिळाली आहेत.·

चाचण्यांदरम्यान कार्डियाकसेन्सने सर्व निकषांवर यूएस एफडीएने आखून दिलेल्या तलसीमा पार केल्याचे आढळून आले आहे. यूएस एफडीएच्या नियमांनुसार फॉल्स डिटेक्शन रेट (एफडीआर) २% पेक्षा जासत नसावा, पण कार्डीयाकसेन्सचा एफडीआर फक्त ०.६% नोंदवला गेला असून अचूकता दर ९९% पेक्षा जास्त आहे.· कार्डियाकसेन्सकडे पेटंटेड, नॉवेल बायो-सेन्सिंग ऑप्टो-मेकॅनिकल सेन्सर्स आहेत जे अत्याधुनिक आर्टिफॅक्ट सेन्सर्ससोबत वापरले गेल्याने आपल्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्याच्या आणि श्वासाच्या वेळी शरीरातील आरोग्यविषयक महत्वाच्या लक्षणांची मॉनिटरिंग करू शकतात.· हृदयाच्या ठोक्यांची सर्वसामान्य तालबद्धता आणि अनियमित पडणारे ठोके (अऱ्हिथमिया), खासकरून ऍट्रियल फिब्रिलेशन (एफिब) यांच्यातील फरक ओळखण्याची क्षमता या डिव्हाईसमध्ये आहे.·

ज्यामध्ये रुग्णाच्या जीवाला धोका असतो अशा अऱ्हिथमियाच्या वेगवेगळ्या प्रकारांपैकी ऍट्रियल फिब्रिलेशन (एफिब) हा सर्वात धोकादायक प्रकार आहे. जगभरात घडणाऱ्या स्ट्रोक्सच्या एकूण घटनांपैकी ६० ते ७०% घटनांचे कारण एफिब असते.· डिव्हाईसद्वारे ब्लड प्रेशर (हायपरटेन्शन), क्रोनिक हार्ट फेल्युअर (सीएचएफ), सीओपीडी आणि स्लीप अप्निया यासारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांवर सातत्याने मॉनिटरिंग केले जाऊ शकते.· डिव्हाईस मध्ये असलेल्या थेट निरीक्षण प्रणालीद्वारे डॉक्टर्स त्यांच्या क्लिनिकमधून दूरवरून म्हणजेच रुग्ण जेथे असेल तिथून ईसीजी टेस्ट करवून घेऊ शकतात व त्यांच्या ईसीजी रिपोर्ट्सच्या आधारावर आजाराचे निदान करू शकतात.

भविष्यात उपयोगी पडू शकतील अशी वैद्यकीय तंत्रज्ञानयुक्त उत्पादने सादर करणारी, देशातील आघाडीची कंपनी एक्स्प्लोर लाईफस्टाईलने एका इस्रायली कंपनीसोबत भागीदारी करून आरोग्य निरीक्षण आणि देखरेख क्षेत्रात, खासकरून कार्डिऑलॉजीमध्ये एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कार्डियाक व मानवी शरीरातील आरोग्यविषयक इतर प्रमुख लक्षणांची देखरेख करू शकेल असे अत्याधुनिक तंत्रज्ञान अगदी सहज वापर करता येईल अशा घड्याळाच्या स्वरूपात सादर करण्यात आले आहे. वेयरेबल तंत्रज्ञानाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवत कार्डियाक सेन्स हे पहिले मेडिकल ग्रेडचे, शरीरातील आरोग्यविषयक प्रमुख लक्षणांवर सतत देखरेख करणारे डिव्हाईस जगभरात लॉन्च करण्यात आले आहे.

पुण्यातील हॉटेल जे. डब्लू. मॅरीयट येथे पार पडलेल्या एका समारंभात हे उत्पादन लॉन्च करण्यात आले आहे. यावेळी कार्डियाक सेन्सचे ईयल कॉपीट आणि इडो मोर व एक्स्प्लोर लाईफस्टाईलचे पंकज बलवानी हे यावेळी उपस्थित होते. अत्याधुनिक इस्रायली बायोसेन्सिंग तंत्रज्ञानांचा वापर करून तयार करण्यात आलेले पेटंटेड ऑप्टो-मेकॅनिकल सेन्सर्स हे प्रोप्रायटरी पीपीजी, ईसीजी आणि आर्टिफॅक्ट सेन्सिंग तंत्रज्ञान व आधुनिक अल्गोरिदम्ससोबत वापरले जात असल्याने हे घड्याळ आपल्या शरीरातील हृदयाच्या प्रत्येक ठोक्याची, हालचालींची नोंद ठेवू शकते. त्यामुळे एफिब सारखी हृदयाच्या ठोक्यांमधील गंभीर अनियमितता होत असल्यास ते या डिव्हाईसच्या लक्षात येते आणि रुग्णाच्या कुटुंबियांना व डॉक्टरांना त्याची सूचना दिली जाते.

ब्लडप्रेशर (हायपरटेन्शन), क्रोनिक हार्ट फेल्युअर (सीएचएफ) आणि इतर कार्डियाक स्थितींमध्ये रुग्णांसाठी याचा वापर केला जाऊ शकतो. प्रत्येक श्वासागणिक श्वसनाचा दर मोजण्याची क्षमता या घड्याळामध्ये आहे. सीओपीडी आणि स्लीप अप्निया यासारख्या स्थितींचे ट्रॅकिंग हे डिव्हाईस करू शकते. श्वसनाच्या दराचे मोजमाप करू शकण्याची क्षमता एखाद्या घड्याळामध्ये असणे ही बाब जगात पहिल्यांदा घडून येत आहे. यूएस एफडीएच्या नियमांनुसार फॉल्स डिटेक्शन रेट (एफडीआर) हा २% पेक्षा जासत नसावा) पण कार्डियाकसेन्सचा एफडीआर अवघा ०.६% आणि अचूकता दर लक्षणीय प्रमाणात जास्त नोंदवला गेला, त्यामुळे जागतिक बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या सर्व वेयरेबल डिव्हायसेसमध्ये हे सर्वात अचूक मेडिकल डिव्हाईस ठरले आहे. युरोपियन युनियनच्या मेडिकल डिव्हाईस रेग्युलेशनअंतर्गत (एमडीआर) सीई सर्टिफिकेशन या डिव्हाईसला आधीच मिळालेले आहे. आता यूएस एफडीएकडून देखील मान्यता मिळवण्याच्या खूप पुढच्या टप्प्यांवर हे उत्पादन पोहोचलेले आहे.

एक्स्प्लोर लाईफस्टाईलचे संस्थापक व सीईओ श्री. पंकज बलवानी यांनी सांगितले, “हृदयाचे ठोके अनियमित पडत असल्याच्या बहुतांश घटनांमध्ये (अऱ्हिथमिया) रुग्णांना हे कळूनच येत नाही की त्यांना ज्यामध्ये जीवाला धोका आहे अशा अऱ्हिथमियाचा त्रास होत आहे. ऍट्रिअल फिब्रिलेशन हा अऱ्हिथमियाचा सर्वात गंभीर प्रकार असून ६० ते ७०% स्ट्रोक हे यामुळे होतात. कार्डियाकसेन्स ९९% अचूकता दरासह ऍट्रिअल फिब्रिलेशन ओळखू शकते. कार्डियाकसेन्स सोबत असेल तर रुग्णांना कधीही कोणत्याही जीवघेण्या स्थितीचा सामना करावा लागणार नाही. सर्व प्रमुख लक्षणांसाठी डॉक्टर्स मोबाईल ऍप व क्लाऊडवर सेव्ह करून ठेवलेल्या रेकॉर्डिंग्स पाहू शकतात आणि एखाद्या कार्डियाक घटनेमध्ये रुग्णाच्या शरीरात नक्की काय झाले असेल त्याची तपासणी करू शकतात. दिवसाचे सर्व तास आणि सर्व दिवस (दिवसाच्या प्रत्येक क्षणाला आणि संपूर्ण दिवस) सतत मॉनिटरिंग करण्याची क्षमता असल्याने डॉक्टरांना रुग्णाची अतिशय उपयुक्त माहिती मिळत राहते, आणि त्या अनुषंगाने निदान करून डॉक्टर रुग्णावर योग्य ते उपचार तातडीने करू शकतात.”

श्री. बलवानी पुढे म्हणाले, “भारतीय बाजारपेठेत अनेक आरोग्यविषयक देखभाल तंत्रज्ञाने सादर करण्यात एक्स्प्लोर लाईफस्टाईल गेल्या दशकभराहून अधिक काळापासून आघाडीवर आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नाविन्यपूर्ण मेडटेक डिव्हायसेस भारतीय बाजारपेठेत उपलब्ध करून देण्यासाठी लक्षणीय यशस्वी अनुभव आमच्याकडे आहे.

जगातील काही सर्वोत्तम कंपन्यांसोबत भागीदारी करून काही सर्वात आधुनिक जीवरक्षक वैद्यकीय साधने सादर करण्यासाठीची प्रक्रिया एक्स्प्लोर लाईफस्टाईलमध्ये सुरु आहे. ही सर्व तंत्रज्ञाने रुग्णालये व डॉक्टरांकडून आज रुग्णांना आरोग्यसेवा ज्याप्रकारे प्रदान केल्या जातात त्यामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणतील. रुग्ण आणि आरोग्य देखरेख तंत्रज्ञान व साधने क्षेत्रात विशेषज्ञ म्हणून आम्ही स्थान मिळवले आहे. कार्डियाकसेन्स लॉन्च करून जगात सर्वात अचूक ऍम्ब्युलेटरी पेशंट मॉनिटरिंग डिव्हाईस सादर करण्याबरोबरीनेच लोकांना ऍट्रिअल फिब्रिलेशनसहित अऱ्हिथमियाच्या काही सुप्त पण जीवाला धोकादायक ठरू शकतात अशा प्रकारांविषयी आणि काही इतर गंभीर आजारांविषयी माहिती करून देण्याचा देखील आमचा उद्देश आहे.” भारतात सप्टेंबर २०२२ पासून हे डिव्हाईस उपलब्ध होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!