
Pune: बिबवेवाडी, अप्पर, सुप्पर, इंदिरा नगर, कोंढवा परिसरातील केक प्रेमींसाठी आनंदाची बातमी म्हणजे ग्राहकांना अत्यंत माफक दरात, ताजा व उत्तम दर्जाचा केक देण्यासाठी युवा उद्योजक अक्षय परदेशी यांनी ‘आपली केक लव स्टोरी’ या नावाने केक शॉप नागरिकांच्या सेवेत रुजू केले आहे. या केक शॉपचे भव्य-दिव्य उद्घाटन परिसराच्या स्थानिक नगरसेविका, पुणे मनपा महिला व बालकल्याण समितीच्या माजी अध्यक्षा सौ रूपालीताई धाडवे तसेच भारतीय जनता पक्ष पुणे शहराचे उपाध्यक्ष, जननायक, समाजसेवक दिनेश उर्फ पिंटूभाऊ धाडवे यांच्या हस्ते तर परदेशी कुटुंबीयांच्या तर शेकडो मित्रपरिवारांच्या उपस्थितीत शनिवार दिनांक ३० जुलै २०२२ रोजी मोठ्या जल्लोषात करण्यात आले.
आपला वाढदिवस असो की Anniversary, गृहप्रवेश असो की गाडीची वर्षपूर्ती, तसेच संस्था असो अथवा कंपनीचा वर्धापन दिवस प्रत्येक शुभ कार्याच्या उत्सव सेलिब्रेशन करतांना आपण केक चा वापर हा करतोच. तसेच केक हा लहान चिमूकल्यां पासून ते जेष्ठांपर्यंत सगळ्यांचाच आवडता पदार्थ असल्याने आपण केक घरात फक्त खाण्यासाठी देखील आणतो. त्यामुळे केकचा वाढता व्यवसाय व डिमांड पाहून आपली केक लव स्टोरी से संचालक श्री. अक्षय परदेशी यांनी विविध ठिकाणी गरजू व होतकरू तरुणांसाठी केक व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये तुम्ही अत्यंत कमी भांडवलात आपली केक लव स्टोरी ची शाखा आपल्या परिसरात चालू करू शकतात अशी माहिती अक्षय परदेशी त्यांचे सहकारी गणेश परदेशी व प्रदीप सुरवसे यांनी दिली.
केक शॉपच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ग्राहकांचा भरगोस प्रतिसाद पाहायला मिळाला, त्यामुळे त्वरा करा आणि आजच शिवराई नगर, लाईन नंबर १६, अप्पर, इंदिरा नगर, बिबवेवाडी येथील आपली केक लव स्टोरी या शॉपला भेट द्या. तसेच केक आॅनलाईन बुक करण्यासाठी तथा Franchisee साठी 90113 20008 अथवा 901100 2293 या नंबर वर संपर्क करा.