पुणेमहाराष्ट्रशैक्षणिकसामाजिक

मैत्री दिवस व रक्षाबंधन निमित्त लामा फेरा फाऊंडेशनतर्फे सायकल भेट

लामा फेरा मॉनेस्ट्री मध्ये मैत्री दिवस व रक्षाबंधन साजरा

पुणे: मैत्री दिवस फक्त सामाजिक माध्यमातून साजरा न करता त्याला खरा मैत्रीपूर्ण व्यवहार आणि संबंधाची जोड असने गरजेचे आहे. कृष्णा आणि सुधामा यांची मैत्री इतिहासातून प्रत्येकाच्या जीवनात उतरली तर समाजात बदल घडल्या शिवाय राहणार नाही. आज लामा फेरा मॉनेस्ट्री मध्ये रक्षाबंधनाचा पवित्र सण साजरा करतांना आमच्या समाज भगिनींना शिक्षणासाठी होत असलेली कसरत दूर करण्यासाठी आम्ही भावांनी सायकल भेट देऊन त्यांचे शैक्षणिक रक्षण करण्यासाठी हातभार लावला याचा मनस्वी आनंद लामा फेरा फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. सत्येंद्र शुक्ला यांनी व्यक्त केला.

भारताला आत्महत्या मुक्त करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेली आंतरराष्ट्रीय लामा फेरा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राद्वारे संचालित लामा फेरा फाऊंडेशनच्या पुढाकाराने स्व. सिंधूताई सपकाळ यांच्या ममता बाल सदन आश्रम तसेच ममता फाऊंडेशन, कात्रज येथील विद्यार्थ्यांसोबत मैत्री दिवस व रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. यावेळी बहिणींनी औक्षण करून भावांना राखी बांधली तर भावांनी रक्षाबंधनाची भेट म्हणून शाळेत जाण्यासाठी सायकल भेट दिली.

आश्रमापासून शाळा दूर असल्याने तसेच येण्या-जाण्यासाठी साधन नसल्याने विद्यार्थांना होत असलेला त्रास व वेळेच्या अपव्यय लक्षात घेऊन लामा फेरा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सत्येंद्र शुक्ला यांनी तसेच त्यांना मोलाचे सहकार्य करणारे मा. नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे, रीना शुक्ला, रेवती दामोदरे, प्रशांत कुमार, शैलेश नाळकर, विकास, सारिका, यशोधन, अंकिता, योगिता भगत, मयुर, सुनिता दाने, रायश्री भोसले, स्वाती, श्रावणी कठाले, इभा, वंदना, उज्वला नाळकर, आनंदी, रोनक सिंग, किसन दादा, सारा शुक्ला, रिया शुक्ला आदींच्या सहकार्याने सायकलीचे वाटप तसेच वस्रभेट, अन्नधान्य, महाप्रसाद आणि गुप्तदान करण्यात आले. यावेळी ममता बाल सदन च्या सेक्रेटरी स्मिता पानसरे, ममता फाऊंडेशनच्या फातमा विद्यार्थ्यांसोबत उपस्थित होत्या.

स्मिता पानसरे म्हणाल्या, लामा फेरा फाऊंडेशनच्या वतिने साजरा करण्यात आलेला यंदाचा रक्षाबंधन आमच्या विद्यार्थांना नेहमीच लक्षात राहिल. शाळेत पायी जावे लागत असल्याने वेळ आणि शारिरीक कसरत खूप होत असे मात्र आता भावाची भेट म्हणून मिळालेली सायकल शैक्षणिक गति प्रदान करून उंच भरारी घेण्यासाठी प्रेरणा देईल. तसेच मुलींनी देखील या भेटी बद्दल सगळ्यांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!