पुणेमहाराष्ट्रविशेषशैक्षणिक

सौ. स्मिता कसमळकर लिखित  ‘वुमन बिईंग’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे (प्रतिनिधी) : प्रत्येक क्षेत्रातील लोकांनी लिखाण करायला हवे. अनेक वेळा दर्जा असलेले व्यक्ती लिहत किंवा बोलत नसल्याने दर्जा नसलेल्या माणसांच ऐकावं तथा वाचाव लागते. महिलांच्या विषयावर कितीही लिखाण केल तरी ते कमीच पडेल इतके प्रश्न महिलांचे असतात. आयुष्य जगत असतांना कस राहव, कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, महिलांचे आरोग्य, शारिरीक व मानसिक दृष्ट्या कस असावे इत्यादी आवश्यक गोष्टींचा अभ्यासपूर्ण समावेश मोजक्या शब्दात सांगायचा उत्तम प्रयत्न लेखीका सौ. स्मिता कसमळकर यांनी ‘वुमन बिईंग’ या पुस्तकात केला आहे. त्यांचे मी अभिनंदन व कौतुक करतो; असे प्रतिपादन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले.

महिलांच्या विषयीच्या अनेक लहान – मोठ्या प्रश्नावर उत्तर म्हणून सल्ला तसेच मार्गदर्शन करण्यासाठी उपयुक्त असणारे ‘वुमन बिईंग’ या सौ. स्मिता कसमळकर यांच्या द्वारे लिखित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्या प्रसंगी आयुक्त गायकवाड बोलत होते. यावेळी व्यवसाय मार्गदर्शक श्रीकृष्ण सावंत, पुला संचालिका सोनिया कोंजेती आपला आवाज, आपली सखीच्या संगीता तरडे व सचिन कसमळकर आदि मान्यवर तसेच कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार व वाचक उपस्थित होते.

लेखिका स्मिता कसमळकर म्हणाल्या, हे पुस्तक वीस वर्षांचा अनुभव व दोन वर्षांच्या अथक परिश्रमानंतर तैयार झाले आहे. या पुस्तकात महिलांच्या बाबतीत असलेल्या अनेक विषयांवर मंथन करून लिहण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला आहे; तुम्हाला तो नक्की आवडेल. खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण सारख्या अनेकांनी या पुस्तकाचे कौतुक केले त्याबद्दल कसमळकर यांनी आभार मानले व प्रत्येक महिलेला हे पुस्तक वाचण्यासाठी आवाहन केले.

व्यवसाय मार्गदर्शक एस. एस. सावंत म्हणाले, एका महिलेकडे अनेक कौशल्य असतात मात्र त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. घरात आर्थिक दृष्ट्या हातभार लावण्यासाठी महिलांनी पुढाकार घेऊन जगाला आपली ओळख करून दिली पाहिजे. आज स्मिता कसमळकर यांचा प्रवास पाहून प्रत्येकाला अभिमान वाटतो. त्यांचे अभिनंदन व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!