Uncategorized

माजी भारतीय पत्रकाराने न्यूयॉर्कमध्ये लाँच केली घुमंटू पिक्सर्च

प्रेरणा ठाकूरदेसाई यांच्याकडे घुमंटू पिक्चर्सचा सुकाणू असून त्यांच्या पहिल्या निर्मितीची हॉलिवूडमधील दिग्गजांकडून होत आहे प्रशंसा

(मुंबई, भारत): जागतिक पातळीवरील पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय आणि बहुभाषिक माध्यमनिर्मितींसाठी काम केल्यावर माजी भारतीय पत्रकार आणि स्वतंत्र चित्रपटनिर्मात्या प्रेरणा ठाकूरदेसाई यांनीघुमंटू पिक्चर्स ही त्यांची स्वतःची चित्रपट निर्मिती कंपनी सुरू केली आहे. ही चित्रपट निर्मिती कंपनी न्यूयॉर्कमध्ये असून चित्रपटनिर्मितीमधील नवनव्या वाटा चोखळणाऱ्या, अपरिचित कल्पनांच्या आणि सांस्कृतिकदृष्ट्या अस्सल कथा सांगणाऱ्या कलाकृती निर्माण करणे हे या कंपनीचे वैशिष्ट्य असेल.

प्रेरणा लष्करी कुटुंबात जन्मलेल्या. त्यामुळे त्यांनी ‘भटके’ आणि बहुरंगी बालपण जगले. त्यानंतर एक पत्रकार आणि चित्रपटकर्त्या म्हणून त्यांना जगभरातील कानाकोपऱ्यातील गोष्टी सांगण्याची त्यांची तळमळ होती. घुमंटू पिक्चर्स हे नाव त्यांच्या आयुष्याचे सार सूचित करते. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय माहितीपटांची चर्चा होत असताना विविध खंडांमधील सीमारेषा जोडणाऱ्या कलेच्या ताकदीच्या माध्यमातून भारत व जग यांच्यातील दुवा होणे हे घुमंटू पिक्चर्सचे उद्दिष्ट आहे.

“अपरिचिताची ओळख करून घेण्याची जिज्ञासा शाश्वत आहे. आम्ही परस्परांची आयुष्ये, संस्कृती आणि मने जाणून घेण्याचा प्रयत्न करू. घुमंटू पिक्चर्स सहयोगाने काम करेल आणि सुयोग्य साधन असेल. विषयाचा सखोल अर्थ जाणून घेणे आणि त्याला मनोरंजनाशी जोडणे हे त्याचे उद्दिष्ट असेल.”, असे प्रेरणा म्हणाल्या.

नुकत्याच सुरू झालेल्या या निर्मिती कंपनीची पहिली सहनिर्मिती पूर्णत्वास येत आहे आणि 2023 च्या उन्हाळ्यात ही कलाकृती सर्वांसमोर येणार आहे. लास्ट एक्स्टॅटिक डेज हा परिवर्तनात्मक फीचर माहितीपट आहे. जाणीवपूर्वक मृत्यू स्वीकारणे हा या माहितीपटाचे विषय असून नॉर्थ कॅरोलायनामधील ॲशविले येथे ही घटना घडते. या माहितीपटात मृत्यूशय्येवर असलेल्या एथन सिसर या तरुणाचा प्रवास दाखवला आहे. ज्याने मृत्यूशय्येवर असलेल्यांची काळजी घेणाऱ्या भारतीय अमेरिकन डॉक्टरच्या नेतृत्वाखालील गटाबद्दल सोशल मीडिया पोस्टमधून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

स्कॉट किर्शेनबॉम यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘द लास्ट एक्स्टॅटिक डेज’ या माहितीपटाचे कार्यकारी निर्माते ‘द किंग्स स्पीच’ या ऑस्कर विजेत्या चित्रपटाचे लेखक डेव्हिड सिडलर; ‘वेकिंग लाइफ’,‘अ स्कॅनर डार्कली’ आणि ‘अपोलो 10½: अ स्पेस एज चाइल्डहूड’ या चित्रपटांचे एमी पुरस्कार विजेते टॉमी पॅलोटा, उपशामक शुश्रुषा (पॅलएटिव्ह केअर) तज्ज्ञ, न्यूयॉर्क टाइम्सच्या लेखिका आणि एक्स्ट्रिमिस याऑस्करमध्ये नामांकनप्राप्त झालेल्या माहितीपटाचा विषय असलेल्या डॉ. जेसिका झिटर हे आहेत आणि ग्रॅमी व गोल्डन ग्लोब विजेते कम्पोझर ॲलेक्स एबर्ट यांनी या माहितीपटाला संगीत दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!