पुणे महानगरपालिका रूग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्यांसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादेत वाढ करणेबाबत

पुणे: शहर हद्दीत गोरगरीब गरजू रुग्णांसाठी पुणे महानगरपालिका शहरी गरीब योजनेमार्फत एक लाख रूपये पर्यंत उत्पन्न असणारे रुग्णांना उपचारासाठी वर्षानुवर्ष सवलत देत आहे. त्या बद्दल पुणे महानगरपालिकेचे मनापासुन आभार देणारे पत्र सोबतच….
धर्मादाय रुग्णालयामध्ये आत्ता रूग्णांसाठी वैद्यकीय उपचारासाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा मोफत उपचारासाठी रक्कम रू. ८५०००/- वरून रक्कम रु.१,८०,०००/- पर्यंत व बिलामध्ये सवलत रक्कम रू. १,६०,०००/- वरून रक्कम रु. ३,८०,०००/- पर्यंत मर्यादा वाढवली आहे. त्याच पद्धतीने आपण देखील पुणे शहरातील गरजु रूग्णांना मदत मिळावी म्हणून धर्मादाय रुग्णालयाप्रमाणे पुणे महानगरपालिका शहरी गरीब रूग्णांना देखील उत्पन्न मर्यादात सवलत दयावे जेणे करून ज्या रुग्णांना खरी गरज आहे. गोर गरीब रुग्णांना याचा फायदा होईल.
तरी या पत्राची दखल घेऊन रुग्णांसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा वाढवावी अशी मागणी भरत सुराणा (पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी) वाणिज्य व उद्योग विभाग (व्यापारी सेल) यांनी आरोग्य अधिकारीकडे निवेदना द्वारे केली आहे.