Uncategorized

एक लाख मोफत संविधान वाटपाचा महासंकल्प; मंत्री चंद्रकांत पाटील याच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ

Pune : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये एक लाख मोफत संविधान प्रति वाटप करण्याचा संकल्प डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आला. एक लाख संविधान मोफत वाटपाचा महासंकल्प उपक्रमाचा शुभारंभ आज मंगळवार दिनांक ११ एप्रिल रोजी पुण्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

शुभारंभ करताना पुण्यातील न्यू इंग्लिश स्कुल, चाटे पब्लिक स्कुल, महात्मा गांधी विद्यालय, अभिनव विद्यालय, सनब्राईट स्कुल इत्यादी शाळांना चंद्रकांत पाटील याच्या हस्ते संविधान प्रत भेट देण्यात आली, याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीचे अध्यक्ष शशिकांत कांबळे, सागर पानसरे हर्षद दौंडकर, RPI चे ऍड. मंदार जोशी, भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, धुर्व जगताप, बामणे सर, मुक्ता बर्वे, भालेकर सर, संदीप बेलदरे इत्यादी उपस्थित होते.

याप्रसंगी मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, अशे उपक्रम गरजेचे आहे. भारतीय संविधान प्रत्येक नागरिकांनी आत्मसात करायला हवे या उपक्रमातून एक लाख मोफत मराठी संविधान महाराष्ट्रातील शाळा व ग्रंथालयात देण्याचा संकल्प कौतुकास्पद आहे मी आयोजकांचे अभिनंदन करतो व त्यांना शुभेच्छा देतो.

यावेळी भावना व्यक्त करताना शशिकांत कांबळे म्हणाले, बाबासाहेबांचे विचार डोक्यात घेतले पाहिजे किंतु आजचे पिढी डोक्यावर घेत आहे. बाबासाहेबांना डोक्यावर घेतल्यापेक्षा डोक्यात घ्या, जयंती ही नाचून साजरी केली पेक्षा वाचून साजरी करा. यासाठीच संविधान वाटपाचा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात होणार असून आज पुण्याची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुभारंभ केला त्याबद्दल त्यांचे आभारी त्यांनी मांनले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!