वारंवार आंदोलने, निवेदन देऊन देखील रेल्वे हद्दीत असलेल्या घोरपडी गावातील झोपडपट्टी धारकांना प्रश्न ऐरणीवर
न्याय अन्यथा आत्मदाह या शिवाय पर्याय नाही... रहिवाशींनी व्यक्त केली खंत
Pune: रेल्वे हद्दीत असलेल्या घोरपडी गावांमधील झोपडपट्टी पंचशील नगर, आगवाडी चाळ, मरीमाता नगर, फैलवाली चाळ, विकास नगर आदी ठिकाणी असलेल्या घरांना अचानक पणे दिलेल्या नोटिसीमुळे गरीब, बहुजन, मागासवर्गीय नागरिकांवर हा अत्याचार असून रेल्वे प्रशासनाकडून दिलेल्या नोटिसीला स्थगिती मिळावी या मागणीसाठी परिसरातील रहिवासी नागरिक व घोरपडी गाव पंचशील नगर झोपडपट्टी बहुजन संघ यांच्या वतीने पुण्यात पत्रकार परिषद आयोजित केली होती.
झोपडपट्टीचा इतिहास सांगत आतापर्यंत केलेल्या संघर्षावर देखील प्रकाश टाकला. अनेक प्रकारचे आंदोलने निवेदने देऊन देखील तोडगा निघाला नाही अशी खंत देखील नागरिकांनी व्यक्त केली. सन 1995 यादीनुसार झोपडपट्टी धारकांना रेल्वे हद्दीतील झोपडपट्टी घोरपडी गाव या परिसरातील पुनर्वसनाचे पाचशे स्क्वेअर फुट शासनाने घरी देण्याबाबत आंदोलन व उपोषण करण्यात येईल असा इशारा देखील या पत्रकार परिषदेत बाळासाहेब जावळे व राज राजपूत यांच्या सह अन्य रहिवासी नागरिकांनी दिला.
यावेळी विवेक वाघमारे, मुकेश इंद्रोल, रहिना खान, मीना पाटोळे, प्रदीप ताडे, नाईमुल्ला खान, रूपाली जगताप, अजान खान, जायदा खान आदी अनेक रहिवासी नागरिक उपस्थित होते.