आरोग्यपुणेमहाराष्ट्रविशेषसामाजिक

बालकलाकार श्रीश खेडेकर आणि दर्श राजेंद्र खेडेकर यांनी केली वारकऱ्यांची सेवा

श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्ट , सद्गुरू आरोग्य सेवा केंद्र आणि शौर्या इंटरप्राईसेस यांच्या वतीने आयोजन

Pune: श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्ट , सद्गुरू आरोग्य सेवा केंद्र आणि शौर्या इंटरप्राईसेस यांच्या वतीने तसेच शेठ ताराचंद हॉस्पिटल अधीक्षक डॉ. कल्याणी भट यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रमोद ठोंबरे डॉ. भाग्यश्री पाटील, डॉ. प्रसाद बघेले, डॉ. ऋतुजा जगदाळे, डॉ सुजाता बनसोडे या पथकाने पुण्यात विसाव्यासाठी असलेल्या वारकऱ्यांची मोफत अरोग्य तपासणी, औषधी वाटप व मसाज सेवा करण्यात आली.

ही सेवा मुंजोबा मंदिर कसबा पेठ, रोकडोबा मंदिर शिवाजी नगर, अखिल मंडई गणपती या ठिकाणी हजारो वारकऱ्यांना देण्यात आली. बाल कलाकार श्रीश राजेंद्र खेडेकर व दर्ष राजेंद्र खेडेकर यांनी वारकऱ्यांसाठी विशेष मसाज अभियान योजना राबवली व वारीतील जेष्ठ वारकऱ्यांना त्यांनी स्वतः विशेष अर्थी तेलाने मसाज केली. या बालकलाकारांना अनेक चित्रपट नाटक आणि टीव्ही सिरियल यांच्या माध्यमातून मिळालेले मानधन यांनी विविध समजाजिक उपक्रकावर खर्च केले आहे.

जेजुरी येथे बाल कलाकार प्रत्येक दिंडीला सुखा शिधा वाटप करणार आहे. व्यसन मुक्ती वर विशेष अभियान हे कलाकार राबवत आहे.बऱ्याच वारकऱ्यांना जीर्ण अजारा साठी डॉ. ठोबरे कडून वेधन कर्म करण्यात आले. या उपक्रमाला शोर्य इंटरप्राईजेस चे चे संभाजीराव कणसे, प्रशांत उडंद्रे सुनील जगताप आनंद लोंढे महेद्रा कदम, बबन राव खेडेकर यांचे सहकार्य तर अनमोल दिले. जेजुरी देवस्थानचे विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडेकर यांची मोलाची मदत मिळाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!