‘ज्ञानेश्वर माउली’ मालिकेच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण पूर्ण
ज्युनिअर कलाकारांनी कास्टिंग दिग्दर्शक सागर शिंदे यांचा केला विशेष सत्कार
पुणे: सोनी मराठी वाहिनीवरील ‘ज्ञानेश्वर माउली’ या मालिकेने संतांची परंपरा उलगडत प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन केलं आहे. काल १५ जून रोजी मालिकेच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून येत्या रविवारी १८ जून रोजी संध्याकाळी ७ वा. मालिकेचा महाएपिसोड सोनी मराठी वाहिनीवर पाहता येणार आहे.
चित्रीकरण पूर्ण झाल्याचा आनंद ज्ञानेश्वर माऊलीच्या संपूर्ण टीमने केक कापून तर स्नेह मेळावातून व्यक्त केला. यावेळी मालिकेतील सर्व कलाकार, निर्मिती संस्थेसह अन्य सहाय्यक टीम उपस्थित होते. ज्युनियर कलाकारांचा सहभाग हा मालिका चित्रीकरणासाठी महत्वाची साखळी असते. ‘ज्ञानेश्वर माउली’ मालिकेचा दीड वर्षाच्या प्रवासात अनेक अडचणी, अडथळे आले किंती कलाकारांनी साथ सोडली नाही हे मालिकेचे खरे यश आहे.
या स्नेहसंमेलना प्रसंगी ज्युनिअर कलाकारांनी कास्टिंग दिग्दर्शक सागर शिंदे यांचा विशेष सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. सागर शिंदे हे मूळ लातूर शहराचे असून शिक्षणासाठी पुण्यात आले. पद्वित्तर पदवी घेत असताना त्याचा चंदेरी दुनियेत प्रवेश झाला आणि एक स्थान आपलं निर्माण केलं. सागर शिंदे यांनी माराठी, हिंदी, दाक्षिणात्य टीव्ही मालिकेत सोबतच सिनेमा, वेब सिरीज, जाहिरात मध्ये नवोदित कलाकारांना संधी देण्यासाठी योगदान देत आहे. जवळपास दोन हजार हून अधिक कलाकार त्यांच्या सोबत काम करतात.
मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षक हरिभक्तीच्या या अलौकिक प्रवासाचे साक्षीदार झाले आहेत. मालिकेतल्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे. मालिकेत विविध संतांची मांदियाळी अनुभवायला मिळते आहे. आळंदीच्या ग्रामस्थांना माउलींच्या दिव्यत्वाचे दर्शन वेळोवेळी होते आहे. माउली आणि त्यांची भावंड यांचे चमत्कार ग्रामस्थांना पाहायला मिळाले. मालिकेचे एकूण ५७१ भाग पूर्ण झाले याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.