पुणे, शिवाजीनगर: जय जवान- जय किसान चे नारे तर जगाचा पोशिंदा शेतकरी विषयी विविध संदेश देत विद्या प्रसारणी सभे अंतर्गत संचालित विद्या वर्धनी इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये महाराष्ट्र कृषीदिन सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये विद्यार्थांनी कृषीदिंडी, शेती उपयोगी अवजारांचे पूजन, वृक्षारोपण, भाषण, गीत गायन, शेती विषयक माहिती देणारे प्रदर्शन, कृषी क्षेत्र आणि शिक्षणाविषयी कृषी सहाय्यक. एस. एस. सावंत सर यांचे विशेष मार्गदर्शन आदी अनेक उपक्रमांचा यामध्ये समावेश होता.
विद्या प्रसारणी सभा यंदा आपले शताब्दी वर्ष साजरे करत असून वर्षभरात अनेक उपक्रम राबवले जाणार आहे. कृषी दिनानिमित्त आयोजित कार्क्रमाच्या वेळी शाळेच्या प्राचार्या रेणू सुमबाली, प्रमुख पाहुणे कृषी महाविद्यालयाचे कृषी सहाय्यक एस. एस. सावंत सर मीडिया वर्ल्ड चे सुमित अंबेकर, शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृषाली चव्हाण, यांनी तर आभार ललिता जाधव यांनी मानले. तसेच श्रद्धा वाघमारे श्वेता मिसाळ नूर जहान शेख मंजिरी वागळे यांचे सहकार्य लाभले.