महाराष्ट्रराजकीयविशेष

सौ. मेघा समीर कुलकर्णी यांचा शुरवीरांच्या सातारा जिल्ह्यामध्ये सत्कार व स्वागत

माजी संरक्षण मंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थित लवकरच सैनिक मेळावा

दिनांक १६ जुलै: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेलच्या राज्य प्रमुख (महिला) पदी निवड झालेल्या सौ. मेघा समीर कुलकर्णी यांचे शुरवीरांच्या सातारा जिल्ह्यामध्ये सत्कार व स्वागत समारंभ कार्यक्रमामधे आयोजन करण्यात आले होते.सातारा येथील माजी सैनिक, महिला परिवार, वीर नारी, वीर पत्नी आणि वीर माता- पिता यांच्याशी संवाद साधत असताना सैनिकांचे व्यक्त केलेल्या काही समस्या आहेत ते राज्यप्रमुख या नात्याने सोडून देऊ आम्ही सर्व सैनिक आपल्या पाठीशी उभे आहोत असा विश्वास दिला मेघा कुलकर्णी यांनी दिला.

सदर प्रसंगी काही सैनिक व महिलांना पद नियुक्ती देण्यात आल्या. पुढील येणाऱ्या काळात आपन एकत्र येऊन चांगले काम करूया असेही त्यानी आव्हान केले. येणाऱ्या काही दिवसामधे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी संरक्षण मंत्री मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थित सैनिक मेळावा ठेवणार आहोत, असेही त्यांनी सांगीतले.

१९९९ मधील कारगील युद्धात सहभागी जालेले कर्नल समीर कुलकर्णी साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सैनिक सेलचे प्रदेश सरचिटणीस, मा बाबासाहेब जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सैनिक सेलचे प्रदेश संघटक, मा कप्तान वसंत आजमाने यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती.

सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सैनिक सेलचे संजय कुमार चंद्रकांत निंबाळकर, डॉ. संजय लावंड, सचिन साबळे, सुधीर शेलार, शंकर गुजर, रमेश भुजबळ, रमेश निंबाळकर, सुभाष निंबाळकर, कॅप्टन हनुमंत जाधव, संजय साबळे, जालिंदर साळुंखे, विकास शितोळे, पांडुरंग इंगळे, विजय साबळे, हनुमंत नावडकर, प्रकाश साळुंखे, विकास जाधव, सुरेंद्र पवार, दादानाथा शिंगाडे, अशोक मांडे, शिवाजी बरंगे, वसंत शेंडगे, सचिन पवार, सुखदेव जाधव, कृष्णा यादव, प्रशांत सावंत, प्रशांत चोरगे, सौ उर्मिला पवार, सौ सविता जाधव, सौ विद्या बरंगे, सौ उज्वला निकम, सौ ज्योती राय उघडे, सौ सीमा जाधव, सौ शुभांगी नलवडे सोबतच शेकडो माज़ी सैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!