माजी संरक्षण मंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थित लवकरच सैनिक मेळावा – मेघा कुलकर्णी
इस्लामपूर येथे सौ. मेघा समीर कुलकर्णी यांचा सत्कार व स्वागत

दिनांक १६ जुलै: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेलच्या राज्य प्रमुख (महिला) पदी निवड झालेल्या सौ मेघा समीर कुलकर्णी यांचे (इस्लामपुर) सांगली जिल्ह्यामध्ये दौऱ्या करत असताना त्यांचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. या निमित्ताने सर्व माजी सैनिकांशी, महिला परिवार, वीर नारी, वीर पत्नी आणि वीर माता पिता यांच्याशी संवाद देखील कुळकर्णी यांनी साधला.
येत्या काही काळातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी संरक्षण मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थित सैनिक मेळावा आयोजित करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे इस्लामपुर शहराध्यक्ष शहाजी बापु पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सैनिक सेलचे प्रदेश सरचिटणीस, बाबासाहेब जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सैनिक सेलचे प्रदेश संघटक, कप्तान वसंत आजमाने यांच्या उपस्थित हा सत्कार समारंभाचे आयोजन केले होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सैनिक सेलचे सांगली जिल्हा अध्यक्ष मा. सचिन ताटे, वाळवा तालुका अध्यक्ष कॅप्टन बाळकृष्ण सावंत, अशोक पाटील, बाबासाहेब कामेरीकद, बाळासाहेब थोरात, शंकर आवटे, मनोहर गलांडे, विश्वास आजमाने, महेंद्र कांबळे, सौ मंगल सावंत, सौ सुधा पाटील, श्रीमती मनीषा झेंडे, सौ उज्वला केवळेकर, श्रीमती विद्याप्रसाद माने, श्रीमती सुनिता खंडागळे, साक्षी जगताप, संजय जाधव, सुनील पाटील, अर्पणा शिंगे तसेच शेकडो माज़ी सैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.