अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त सायकल स्पर्धेचे आयोजन
Pune: जनमानसांत ‘विकासपुरुष’ अशी प्रतिमा असणारे राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पुणे ते बारामती’ या राष्ट्रीय सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
बारामती होस्टेल येथे ज्येष्ठ उद्योजक श्री. विठ्ठलशेठ मणियार यांच्या हस्ते झेंडा दाखवून आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपालीताई चाकणकर, श्री. शिवाजी काळे आणि अॅड. संदीप कदम सर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. सायकलप्रेमींनी मोठ्या उत्साहात या स्पर्धेत सहभाग दर्शवला.
यावेळी सहभागी सर्व स्पर्धकांना शहर अध्यक्ष दीपक मानकर व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास माजी नगरसेवक बाळासाहेब बोडके, काका चव्हाण, बाबा धुमाळ, विनोद ओरसे, दयानंद इरकल, पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.