आरोग्यपुणेमहाराष्ट्रराजकीयविशेष

पुण्यात ६ ऑगस्ट रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजन

वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे गरजू रुग्णांवर उपचार होणार

रविवारी कार्यसम्राट महाआरोग्य शिबिराचे आयोजन

पुणे: भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची “स्वस्थ ग्राम – स्वस्थ भारत” या संकल्पना सर्वांसाठी प्रेरणादायी आहे तसेच गिरीश महाजन यांचे “रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा” हे ब्रीदवाक्य घेऊन संपूर्ण महाराष्ट्रातील गरजु व गरीब रुग्णांसाठी केले जाणारे सेवाकार्यसुध्दा समाजासाठी अतिशय मोलाचे आहे.


या पार्श्वभुमीवर गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पुणे मतदारसंघातील गरजु रुग्णांच्या सेवेसाठी कार्यसम्राट आमदार विनायक निम्हण यांच्या जयंती निमीत्त सोमेश्वर फॉऊंउेशन,पुणे यांच्या वतीने यांनी रविवारी ०६ ऑगस्ट, २०२३ रोजी “विनामुल्य आरोग्य शिबीरचे” आयोजन कृषी महाविद्यालय मैदान,भोसले नगर, शिवाजीनगर, पुणे येथे करण्यात आले आहे.


या शिबीराचा पुर्व टप्पा म्हणुन २२ जुलै ते ०४ ऑगस्ट २०२३ पर्यंत रुग्ण पुर्व तपासणी अभियान शिवाजी नगर मतदार संघात शिवाजीनगर, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, बाणेर, बालेवाडी, इत्यादी भागातील अभियानात एकुण ५७९६३ रुग्णांची पुर्व तपासणी नंतर द्वितीय रुग्ण तपासणी अभियानात आवश्यक रक्त, लघवी, ईसीजी, एक्स-रे इत्यादी प्रकारची तपासाणी मोफत करण्यात येत आहे.

शिबीराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री,देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे असणार आहेत. प्रमुख पाहुणे केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, अल्पसंख्यांक विकास मंत्री अब्दुल सत्तार, रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे, शिवसेना उपनेते सचिन अहिर आदी सर्वपक्षीय मान्यवर उपस्थित असणार आहेत.


अशी माहिती पञकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत माजी सनी निम्हण यांनी दिली यावेळी कक्ष अधिकारी रामेश्वर नाईक सोमेश्वर फाऊंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

शिबीराचे वैशिष्टे –
• विनामुल्य आरोग्य शिबीरात सर्व पॅथींचा समावेश.
ॲलोपॅथी, आयुष (आयुर्वेद, होमिओपॅथी, योग, युनानी), दंतचिकीत्सा इत्यादी तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया व औषधी विनामुल्य उपलब्ध
• देशातील नामवंत तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती.
डॉ.वाकणकर, डॉ.गौतम भंसाळी, डॉ.रमाकांत देशपांडे, डॉ. के.एच संचेती, डॉ.विकास महात्मे डॉ.संचेती, डॉ.यशराज पाटील, डॉ.ललवाणी, डॉ.चंदनवाले, डॉ.तांबे, डॉ.जगन्नाथ दिक्षीत, डॉ.अमित मायदेव, डॉ.अजय चौरसिया इत्यादी
• विविध आजारांवरील उपचार
एकुण ८० बाह्यरुग्ण कक्षांचा समावेश
सदरील बाह्यरुग्ण कक्षांत आयुष, नेत्रचिकीत्सा, दंतचिकीत्सा, कान नाक घसा, जनरल मेडीसीन, जनरल सर्जरी, हृदयरोग, श्वसनविकार, मुत्ररोग, प्लॉस्टिक सर्जरी, स्त्रीरोग, बालरोग, अस्थिव्यंगोपचारशास्त्र, अनुंवशीक विकार, कर्करोग, लठ्ठपणा, वृध्द जनरल तपासणी, मतीमंद रुग्ण तपासणी, मनोविकार, मेंदुरोग इत्यादी आजांरावर विनामुल्य औषधोपचार व शस्त्रक्रिया
त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या आवश्यक रक्त व लघवी चाचणी नमुणे संकलन, तसेच इ.सी.जी, मॅमोग्राफी, पी.एफ.टी., बी.एम.डी. तपासणी

• गरजु रुग्णांना मोफत वितरण
कृत्रिम अवयव, चष्मे, वृध्दकाठी, अंधकाठी, दिव्यांग साहित्य, कर्णयंत्र, दातांच्या कवळया यांचे नोंदणीनुसार वाटप
• आपतकालीन व्यवस्थेमध्ये कार्डीयाक रुग्णवाहीका, रुग्णवाहीका, अग्निशमन वाहन, रुग्ण स्ट्रेचर, व्हिलचेअर यांचा समावेश
• सर्व रुग्ण व रुग्णनातेवाईक यांना मोफत नास्ता व भोजनाची सोय.करीता सर्व नागरीकांनी या बहुमुल्य संधीचा लाभ घ्यावा असे आयोजक सोमेश्वर फॉऊंउेशन, पुणे तसेच निमंत्रक माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी आवाहान केले आहे. रुग्णहिताय गरजू नागरिकांनी आधिक माहितीसाठी ८३०८१२३५५५ या नंबरवर संपर्क करावा किंवा www.sunnynimhan.com या वेबसाईटवर नोंदणी करावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!