राज्यभरातील सायकलपटूंची भारत मातेला मानवंदना
श्रीगोंदा: श्रीगोंदा तालुका सायकल असोसिएशनने स्वातंत्र्य दिन अमृत वर्षा निमित्ताने दोन दिवशीय ७६किमी राईडचे आयोजन केले विजया लंके यांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ७६ किमी चा आॅनलाईन सायक्लिग इव्हेंट राबविण्याची कल्पना मांडली त्याला श्रीगोंदा तालुका सायकल क्लब चे अध्यक्ष नवनाथ दरेकर यांनी होकार दिला.
विजया लंके यांनी या उपक्रमाचा चांगल्या पध्दतीने आॅनलाईन प्रसार केला आणि नियोजन करण्यासाठी मेहनत घेतली आणि राज्यभरातून प्रतिसाद लाभला उपक्रमात राज्यभरातील १७६ सायकल पटूंनी भाग घेऊन भारत मातेला मानवंदना दिली.
या उपक्रमात मध्ये सोलापूर, सिन्नर, नाशिक, मालेगाव, बोरगड, बागलाण, सटाणा, नेवासा, सांगली, जायखेडा, पाचोरा, जळगाव, अमरावती, चांदशी, निफाड, डोंबिवली, चिंचवड, पुणे, गांधीनगर गुजरात, पुरंदर, पुणे, औरंगाबाद, चाळीसगाव, राशीन,अहमदनगर श्रीगोंदा येथील सायकल पटूनी सायक्लिग केले श्रीगोंदा तालुका सायकल असोसिएशन सायकल चालून भारत मातेला मानवंदना देणाऱ्या सायकल पटूंना सुवर्ण पदक बहाल करणार आहे.
या उपक्रम यशस्वी होण्यासाठी श्रीगोंदा सायकल क्लबचे सदस्य विजया लंके गोपाळ डांगे गौरी कोहळे मिठू लंके यांनी विशेष परिश्रम घेतले श्रीगोंदा तालुका सायकल असोसिएशन चे अध्यक्ष नवनाथ दरेकर म्हणाले कि प्रत्येक स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने असे उपक्रम राबवले जाणार आहेत. श्रीगोंदा येथील सायकल पटूंना तहसीलदार मिलिंद कुलथे यांचे हस्ते लवकरच पदक देण्यात येणार आहेत .