पुणे (प्रतिनिधी): दिगवंत डॉ. जी. वी. शिंगरे यांच्या प्रथम स्मृती स्मरणार्थ विद्या प्रसारणी सभा शताब्दी वर्षानिमित्त विद्या वर्धनी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज शिवाजीनगर यांच्या पुढाकाराने अंतरशालेय वादविवाद स्पर्धा २०२३ चे आयोजन शाळेच्या प्रमाणात दिनांक ५ ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते. “पारंपारिक वर्गातील शिक्षणावर ऑनलाइन शिक्षणाचा परिणाम” या विषयावर घेण्यात आलेल्या स्पर्धेत पुणे शहरातील ११ शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
स्पर्धेच्या परीक्षक म्हणून पावनी लिखाते व सुनीता अल्वा यांनी जबाबदारी सांभाळली. तर पाहुणे म्हणून विद्या प्रसारिणी सभेच्या अध्यक्षा डॉ. सौ मृणालिनी गरवारे, कार्यवाहक डॉ सतीश गवळी सहकार्यवाहक श्री विजय भुरके, डॉ. मेहता, सभासद प्रमोद कुदळे, सभासद सौ विशाखा भुरके, अध्यक्ष नाथ हरि पुरंदरे प्रशाला विलास टापरे, सदस्य विद्यावर्धिनी इंग्लिश स्कुल साधना कुदळे, प्राचार्या उज्वला पिंगळे, पुजा भुरके आदि उपस्थित होते.
स्पर्धेचा प्रथम विजेते विद्या वर्धिनी इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज च्या दिशा योगेश पुजारी, प्रेरणा सुधिर कांबळे. द्वितिय विजेते पी. ई. एस मॉडन हाय स्कुल पाषाण आर्य देवडीकर, ऋग्वेद मानकर तर तिसरे विजेते श्रीमती इंदीराबाई रामचंद्र करंदीकर माध्यमिक विद्यालयाचे सानिया संजय आगव, जानवी पद्दमाकर पोकळे हे विद्यार्थी विजयी ठरले. सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व रोख रक्कम असे या बक्षीसाचे स्वरूप होते.
या कार्यक्रमाला मार्गदर्शक श्री विजय भुरके अध्यक्ष विद्या वर्धिनी शाळा तसेच शाळेच्या प्राचार्या सौ रेणू सुंबाली यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. शाळेतील शिक्षिका सौ. ललीता जाधव, पी राजेश्वरी, सोनल कांबळे, मोहिनी भोकरे कविता जगताप, वृषाली चव्हाण तसेच सर्व शाळेतील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा सहभाग लाभला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. ललीता जाधव व रोनी दास यांनी केले व कार्यक्रमाचे आभार सौ राजेश्वरी यांनी व्यक्त केले कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.