खेलो इंडिया वुमेन्स किकबॉक्सिंग स्पर्धेचे पुण्यात शानदार उद्घाटन
पुणे – केंद्र शासनाच्या खेलो इंडिया या मोहिमेअंतर्गत अस्मिता खेलो इंडिया वुमेन्स किकबॉक्सिंग लिग २०२३ या स्पर्धेचे उद्घाटन आज पुण्यात खराडी येथील कै. विठोबा पठारे स्पोटर्स कॉम्प्लेक्समध्ये मोठ्या दिमाखात झाले. याप्रसंगी स्पोटर्स अॅथॉरिटी ऑफ इंडियाचे निरीक्षक व कुस्तीचे राष्ट्रीय पंच अमरसिंग निंबाळकर, बीजेपी युवा मोर्चाचे जनरल सेक्रेटरी सुरेंद्र पठारे, उद्योगपती सनी सांकला, समाजसेविका रिमा सेन , धीरज वाघमारे व पॉवरलिफ्टर खेळाडू सुप्रिया सुपेकर, स्पर्धेचे आयोजक महाराष्ट्र किकबॉक्सिंग स्पोटर्स असोसिएशनचे अध्यक्ष निलेश शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.
शासनाने खेलो इंडिया या मोहिमेअंतर्गत किकबॉक्सिंग या खेळाचा समावेश केल्यामुळे यातून अनेक उत्तम खेळाडू तयार होतील आणि देशाचे नाव उज्ज्वल करतील असा विश्वास बीजेपी युवा मोर्चाचे जनरल सेक्रेटरी सुरेंद्र पठारे यांनी व्यक्त केला.
प्रास्तविकात बोलताना आयोजक निलेश शेलार यांनी सांगितले की, खेलो इंडिया या मोहिमेअंतर्गत देशभरात एकूण ३६ ठिकाणी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. राज्यात तीन ठिकाणी ही स्पर्धा होणार असून पुण्यात होत असलेल्या या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राज्यातील ३३ जिल्ह्यांतून सुमारे ९५० खेळाडू आले आहेत.
अत्यंत उत्साही वातावरणात आणि स्पर्धकांनी साठी हे विशेष व्यासपीठ निर्माण करणारी ही स्पर्धा आहे. अब इंडिया खेलेगा …किक बॉक्सिंग या आरोळ्यांनी स्टेडियमचा परिसर खेळाडूंनी दणाणून सोडला होता.
राज्य पातळीवरील या स्पर्धेतून देशपातळीवर खेळाडूंची निवड होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मकरंद जोशी यांनी केले.