महा एनजीओ फेडरेशनच्या वतीने जिल्हा समन्वयक नियुक्ती प्रदान

पुणे : महा एनजीओ फेडरेशन जिल्हा समन्वयक नियुक्ती प्रदान व स्नेहमिलन समारंभाचे आयोजन पुण्यात करण्यात आले होते. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व जिल्हा समन्वयकांना त्यांच्या जबाबदारीसाठी नियुक्ती पत्र देण्यात आले. फेडरेशनच्या माध्यमातून तळागाळातील संस्था पर्यंत पोहोचून त्यांना योग्य दिशा देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
थ्री डी डेस्टिनेशन हॉल मुकुंद नगर पुणे येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी महा एनजीओ फेडरेशन संस्थापक शेखर मुंदडा, वरीष्ठ संचालक मुकुंद शिंदे, संचालक अमोल उंबरजे, योगेश बजाज, अक्षय महाराज भोसले, गणेश बाकले उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्रातील २३ जिल्ह्यातील ५५ जिल्हा समन्वयक उपस्थित होते.
संस्थापक शेखर मुंदडा यांनी सर्व समन्वयकांना महा एनजीओ फेडरेशनच्या वतीने जिल्हा समन्वयकाचे ध्येय व उद्दिष्ट्ये त्याचबरोबर समाजात कोणत्या पद्धतीने महा एनजीओ फेडरेशनची वाटचाल असली पाहिजे, यावर मार्गदर्शन केले. तसेच महाराष्ट्र गोसेवा आयोग ७ जी म्हणजे गो संगोपन, गो संरक्षण, गो संवर्धन, गोशाळा, गोरक्षक, गो मूल्यवर्धन व गो आधारित शेती बाबत माहिती दिली.
अक्षय महाराज भोसले यांनी शासकीय योजना तळागाळातील लोकांपर्यंत कसे पोहचवता येतील यावर मार्गदर्शन केले. योगेश बजाज यांनी समन्वय साधला व वरिष्ठ संचालक मुकुंद शिंदे यांनी सर्वांचे अभिनंदन केले व आभार मानले. कार्यक्रमासाठी राहुल जगताप, अपूर्वा करवा, स्वप्निल पोफळे व विठ्ठल काळे यांनी परिश्रम घेतले.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील समन्वयक खालीलप्रमाणे -सुरज सूर्यवंशी अहमदनगर; प्रसन्न धुमाळ अहमदनगर; रामपाल पांडे अहमदनगर; अवधूत कुलकर्णी अहमदनगर; डॉ. गिरीश कुलकर्णी अहमदनगर; तुषार हांडे अकोला; प्रतिभा पाटील अकोला; बंडू आंबटकर अमरावती; माधुरी चव्हाण अमरावती; प्रल्हाद कुटे बीड; बाजीराव ढाकणे बीड; दिलीप बिसेन भंडारा; सुनंदा नेवारे भंडारा; महेंद्र सोभागे बुलढाणा; शिला मोहोळ बुलढाणा; हरीशचंद्र पाल चंद्रपूर; किशोर चौधरी चंद्रपूर; सुहास न्यायाधीश, छत्रपती संभाजीनगर; अतुल धातबले छत्रपती संभाजीनगर; गीता कपूरे छत्रपती संभाजीनगर; तानाजी जाधव धाराशिव; संजीव आगळे धाराशिव; मीना भोसले धुळे; दिलीप माळी धुळे; अखिल शेख गडचिरोली;
विक्रांत इंगळे गोंदिया; खंडू आढाव हिंगोली; अमोल गोबाडे हिंगोली; हर्षाली चौधरी जळगाव; पलाश मंडलेचा जळगाव; मुरली सुरसे जालना; लक्ष्मण मदन जालना; अशोक पोतनीस कोल्हापूर; ऐश्वर्या मुनीश्वर कोल्हापूर; डॉ. विजय राठी लातूर; अॅड. महिवीर (कपिल)पोकर्णा लातूर; चंद्रकला भार्गव लातूर; गुलाब चांडक मुंबई; दीपक कलिंगण मुंबई; संध्या भोयर नागपूर; शेखर जनबंधू नागपूर; दिनेश वाघमारे नागपूर; अभय आलोडे नागपूर; डॉ गणपतराव जिरोणेकर, नांदेड; लोकेश सातोरे नांदेड; डॉ उत्कर्ष राणे नंदुरबार; शेख शब्बीर मन्सुरी नंदुरबार; डॉ.भालचंद्र ठाकरे नाशिक; नलिनी सोनवणे नाशिक; डॉ. उल्हास कुटे नाशिक; यती राऊत मुंबई पालघर; परमेश्वर स्वामी परभणी; विनोद डावरे परभणी; सागर पाटील पुणे; डॉ. मिलिंद भोसुरे पुणे; चेतन मराठे पुणे; वीणा दीक्षित पुणे; प्रशांत वर्मा मुंबई; दिपाली देशमुख सातारा; मनोज विधाते सातारा; महेश कासट सोलापूर; डॉ.मनोज देवकर सोलापूर; जया शेंडे वर्धा; अमर पोटफोडे वर्धा; शहनाज फारुख बेनिवाल वाशीम; डॉ संजय रोठे वाशीम; राजकुमार भगत यवतमाळ; इरफान शेख यवतमाळ यांची जिल्हा समन्वयक म्हणून निवड करण्यात आली आहे.