आरोग्यपुणेमहाराष्ट्रविशेषसामाजिक

कर्करोगाच्या जनजागृती कार्यक्रमांतर्गत पुण्यात “कॅन्सल द कॅन्सर” उपक्रमाचे आयोजन

काऊडिग्नीटी अँड फार्मर्स प्रोग्रेस फाउंडेशन' या संस्थेच्या पुढाकारातून मोफत कॅन्सर तपासणी व उपचार

पुणे (प्रतिनिधी): कर्करोगाच्या जनजागृती कार्यक्रमांतर्गत आरोग्य आणि गो रक्षणासाठी योगदान देत असलेल्या काऊडिग्नीटी अँड फार्मर्स प्रोग्रेस फाउंडेशन या संस्थेच्या वतीने पुण्यात “कॅन्सल द कॅन्सर” हा तीन दिवशीय उपक्रम २३ ते २५ डिसेंबर २०२३ दरम्यान मोडक सभागृह, विद्यार्थी सहाय्यक समिती, हॉटेल लालित महाल, एफ.सी. रोड, शिवाजीनगर, पुणे येथे आयोजित केला आहे. यामध्ये मोफत कॅन्सर तपासणी, उपचार, कॅन्सर परिसंवाद, रक्तदान शिबिर आणि पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन केले गेले आहे. अशी माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ‘काऊडिग्नीटी अँड फार्मर्स प्रोग्रेस फाउंडेशनचे संस्थापक सूर्या पुजारी, सामाजिक कार्यकर्ते सुरेश सपकाळ, व्यवसाय मार्गदर्शक एस. एस. सावंत, बाल भाक्रे, प्रणव थोरात आदी उपस्थित होते.

येत्या शनिवार दिनांक २३ डिसेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता विद्यार्थी सहाय्यक समिती, हॉटेल ललित महाल, एफ. सी. रोड, मोडक सभागृह येथे उपक्रमाचे उद्घटन होणार असून. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, मुंबईचे प्रसिध्द डॉ. पीयूष सक्सेना, व्यवसाय मार्गदर्शक एस. एस. सावंत, सुरेश सपकाळ यांच्या सह काही अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. रविवार दिनांक २४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजे पासून ते सायंकाळी ५ वाजे पर्यंत रक्तदान शिबिर व कॅन्सर तपासणी केली जाणार आहे. तसेच कॅन्सर आजारावर काम करणारे प्रसिध्द डॉक्टर यांचा परिसंवाद आयोजित असणार आहे.

सोमवार दिनांक २५ डिसेंबर रोजी सकाळी कॅन्सर तपासणी, दुपारी १२.३० वाजता परिसंवाद आणि दुपारी ४ वाजता विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित केला गेला आहे.

नॅशनल कॅन्सर रजिस्ट्रीनुसार जगभरात कॅन्सरच्या रुग्णात प्रचंड प्रमाणात वाढ होत असून गेल्या वर्षात १४ लाख ६१ हजार रुग्णांचे निदान करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील १ लाख २१ हजार ७१७ रुग्णांचा समावेश होता. बदलत चाललेली जीवनपद्धती, खाण्यापिण्याच्या सवयी अश्या आजारांना निमंत्रित करत आहे. या आजारांचे प्रमाण कमी करायचे असेल तर आपल्या जीवनशैलीत व आहारपानात बदल करण्याची अत्यंत आवश्यकता आहे अशे मत सूर्या पुजारी यांनी व्यक्त केले.

संस्थेविषयी माहिती – मूळ भारतीय देशी गाईंच्या अस्तित्वासाठी काऊडीग्निटी अँड फार्मर्स प्रोग्रेस फाउंडेशन काम करत असून संस्थेचा हेतू सर्वथा शेतकरी हिताचा आहे. कारण केवळ शेतकरीच आपल्या देशी गायींना वाचवू शकतात. सद्या काऊडीग्निटी अँड फार्मर्स प्रोग्रेस फाउंडेशन देशी गायींचे संगोपन करत करत आहे. या सोबतच देणगी, लोकांचा सहभाग आणि गाईगुरे पशु यांचे संगोपन करणाऱ्यांना एकत्रित आणून संसाधनांच्या निर्मितीद्वारे चांगल्या लक्षित लोकांची योग्य बाजारपेठ मिळून देण्याचा हेतू संस्थेचा आहे. जेणेकरून त्यांच्या ए२ दूध आणि संलग्न उत्पादनांना योग्य किंमत मिळेल. येणाऱ्या काही काळातच देशासोबतच विदेशातील पर्यटकांसाठी “गोशाळा पर्यटन” चालू करण्याचा संस्थेचा मानस आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!