क्रीडापुणेविशेषशैक्षणिक

आदित्य इंग्लिश मिडीयम स्कूलचा सांस्कृतिक महोत्सव उत्साहात

मुलांना उत्कृष्ट नागरिक बनवणं हे पालकांचे कर्तव्य - पुणे ग्रामीण अतिरिक्त पोलिस आयुक्त मितेश गट्टे

पुणे -आपली मुले समाजात उत्कृष्ट नागरिक झाली पाहिजेत ही महत्वपूर्ण जबाबदारी प्रत्येक पालकांनी निभावली तर सामाजात एक दर्जेदार पिढी निर्माण होऊ शकते.मुलांमध्ये नितीमुल्यांचा विकास झाला पाहिजे. घर आणि शाळेतून त्यांना उत्तम शिस्त लागू द्या. छोट्या चुकांमधून मोठ्या चुका घडण्याची भीती असते. छोटे छोटे नियम पालकांनी देखील पाळले पाहिजेत. गुन्हेगारी मुक्त समाज घडवण्यासाठी आतापासून या गोष्टींचे पालकांनी पालन करावे असे आवाहन मितेश गट्टे यांनी केले.

शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक, गुणात्मक,नावीन्यपूर्ण विचार वाढ आणि महापालिका शाळांची गुणवत्ता वाढ यासाठी श्री भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या वतीने औंध मधील पं.भीमसेन जोशी सभागृह येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थी व पालकांना गट्टे यांनी मार्गदर्शन केले.यावेळी संस्थेचे संस्थापक शिवलाल धोंडीबा धनकुडे, माजी आमदार व उपाध्यक्ष राष्ट्रीय महिला मोर्चा मेधाताई कुलकर्णी, पुणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मितेश गट्टे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाचे सचिव अनुराधा ओक, पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल अडे,कार्यकारी अभियंता अंकुर कावळे, गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शरद शिंदे,अध्यक्ष सुरेखा धनकुडे, कार्यकारी अधिकारी सुषमा भोसले, सचिव विराज धनकुडे, खजिनदार राहुल धनकुडे,बाणेर शाखेच्या मुख्याध्यापक रेखा काळे,सुस शाखेच्या माधुरी शेवाळे व ॲड.संकेत बुंदिले उपस्थित होते.

मितेश गट्टे म्हणाले;”स्पर्धेत एखाद्या मिळालेल्या यशाने हुरळून न जाता यशाची आस विद्यार्थ्यांच्या मनात कायम राहिली पाहिजे. यशाच्या भुतकाळ रमण्यापेक्षा यशाची तृष्णा जिवंत ठेवणारे विद्यार्थी आपल्याला घडवायचे आहेत. परीक्षेतील यश फक्त गुणांपुरते मर्यादित आहेत पण आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर पुस्तकाबाहेरील जग खूप मोठे आहे.समर्थपणे तग धरून राहणारे विद्यार्थी आपल्या तयार करणे ही आपली जबाबदारी आहे.अशी भावना गट्टे यांनी व्यक्त केली.

माजी आमदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या ;”मुलांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहावे, त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होऊ नये यासाठी पालकांनी मुलांमधील विशेष प्रावीण्य ओळखून त्याला प्रोत्साहित करावे. मुलांना काय आवडते त्यानुसार त्यांचा विकास होऊ द्या. स्व. लता मंगेशकर यांना गणित सोडवायला सांगितले असते किंवा सचिन तेंडुलकर यांना विज्ञानाचा अभ्यासात कच्चा आहेस असे जर पालकांनी सांगितले असते तर आज आपल्याला कदाचित भारतातील ही दोन रत्ने मिळाली नसती. त्यामुळे पालकांनी मुलांवर अपेक्षांचे ओझे लादू नये असे प्रतिपादन माजी आमदार व उपाध्यक्ष राष्ट्रीय महिला मोर्चा मेधाताई कुलकर्णी यांनी केले.

नर्सरी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये या उपक्रमांतर्गत संस्थेच्या विविध शाळांमध्ये विविध कार्यक्रम झाले असून यामध्ये आंतरशालेय स्पर्धा, गेम्स झोन, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रश्नमंजूषा, ट्रेझर हंट आदी उपक्रम झाले.त्याचे बक्षीस वितरण यावेळी पार पडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!