आरोग्यपुणेमहाराष्ट्र

मानव अधिकार राजदूत संघटनेचे एक दिवसिय सकाळी उपोषण

Pune: पुणे महानगरपालिका व क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत अर्धवट कामे व गलथन कारभाराविरोधात मानव अधिकार राजदूत संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी एक दिवसिय सकाळी उपोषण करण्यात आले.

पुणे महानगरपालिकेच्या समोर करण्यात आलेल्या उपोषणामध्ये डॉक्टर अविनाश सकुंडे, प्रदेश उपाध्यक्ष संग्राम तळेकर, युवा राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण राठोड, कैलासदादा पठारे, राज राजपूत व भारत पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

पुणे शहरातील पेठा परिसरात रस्त्यावर जागोजागी झालेले खड्डे, ड्रेनेज लाईन, पाण्याची लाईन, पावसाळी चेंबर स्वच्छ करून रोडच्या समपातळी करण्याची मागणी, सार्वजनिक शौचालयांमध्ये स्वच्छतेचा अभाव पाणीपुरवठा वेळेवर नसणे, स्वच्छता मध्ये लावण्यात आलेल्या स्टिकर वर कारवाई करणे, रोडवरील धोकादायक वृक्षांच्या फांद्यांची छाटणी करणे आदी अनेक मागण्याचे निवेदन देऊन जर येणाऱ्या २ तारखेपर्यंत काम नाही झाले तर ४ जानेवारीपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा संग्राम तळेकर यांनी यावेळी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!