देश-विदेशपुणेमनोरंजनमहाराष्ट्रव्यवसायीक

‘द निश इंटरनॅशनल’ तर्फे सुमित अंबेकर (जैन) सन्मानित

माध्यमांचा योग्य उपयोग तुम्हाला यशाकडे नेणारा ठरेल; सुमित अंबेकर

पुणे: जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेले ‘द निश इंटरनॅशनल’ या त्रैमासिक फॅशन मासिकाचे प्रकाशन आणि सन्मान सोहळा कोरेगाव पार्क येथील फ्रिक सुपर क्लब येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात अत्यंत कमी कालावधीत यश संपादन करून इतर युवकांना प्रेरित कण्यासाठी अग्रेसर असणारे ‘मीडिया वर्ल्ड’ चे संचालक, युवा मध्यम समन्वयक सुमित अंबेकर (जैन) यांना विशेष सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी ‘द निश इंटरनॅशनल’ चे संस्थापक/मालक सायरस पेस्टोनजी, सेलिब्रेटी मॉडेल यास्मिन मिस्त्री, (मिसेस इंडिया इंटरनॅशनल युनिव्हर्स २०२३), दिपाली खमर (गुजरात), द निश इंटरनॅशनलच्या फॅशन एडिटर पूजा ग्यानानी (मुंबई), सेलिब्रिटी शो स्टॉपर्स सन्ना सुरी (नवी दिल्ली), प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

“आजच्या युगात ९९% लोक माध्यमांच्या जाळ्याचा एक भाग आहे. किंतु या माध्यमांचा चांगला उपयोग करायला शिकले तर; तुम्ही तुमच्या कामाला उत्तम गती प्राप्त करून यश संपादन करू शकता एवढी क्षमता माध्यमांमध्ये आहे.” अशे उदगार ‘मीडिया वर्ल्ड’ चे संचालक, सुमित अंबेकर (जैन) यांनी व्यक्त केले.

सदर प्रकाशन सोहळ्या दरम्यान आयोजित केलेल्या Celeb Models Nite, 2024 ने उपस्थितांचे मने जिंकली. या शो मध्ये सर्वोत्कृष्ट मॉडेल वॉकसाठी ३ मॉडेल्सची निवड केली गेली. प्रथम कांचन शिंपी, दुसऱ्या श्लोका पटेल आणि तिसऱ्या स्थानावर पूजा सिंग विजेत्या ठरल्या. संपूर्ण शोचे आयोजन द निश इंटरनॅशनलने केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!