आरोग्यपुणेसामाजिक

प्रजासत्ताक दिन व डॉ. विठ्ठल जाधव(IPS) यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व पुरस्कार वितरणाचे आयोजन

२६ जानेवारी रोजी शांतिदूत परिवारातर्फे राज्यभर रक्तदान शिबिर

पुणे (प्रतिनिधी): शांतिदूत परिवार आणि एल. ओ. सी. हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने देशाचा प्रजासत्ताक दिन व सेवानिवृत्त विशेष पोलीस निरीक्षक महाराष्ट्र राज्य डॉ. विठ्ठल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व पुरस्कार प्रदान सोहळा शुक्रवार दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डॉ. विठ्ठल जाधव, डॉ. शशांक शाह, तृषाली जाधव, सुरेश सकपाळ, अकबर मेमन, पी. एस. साळुंखे व मोनिका भोजकर उपस्थित होते.

दरवर्षी राज्यभर होत असलेल्या या रक्तदान शिबिरामध्ये हजारो रक्तपेशव्यांचे संकलन केले जाते. यंदाच्या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे पुणे शहरात स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेले दिव्यांग विद्यार्थी रक्तदान करणार आहेत. मागील वर्षी भिक्षेकरूनी रक्तदान केले होते. हा समाजोपयोगी उपक्रम आजीवन करणार असल्याचे डॉ. शाह यांनी या प्रसंगी सांगितले.

एल. ओ. सी. हॉस्पिटल सदाशिव पेठ, फडके चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरा सोबतच; विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना कौतुकाची थाप म्हणून ‘शांतीदूत परिवार सेवारत्न पुरस्कार २०२४’ आणि ‘शांतिदूत परिवार सेवा गौरव पुरस्कार २०२४’ चे देखील वितरण करण्यात येणार आहे. यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आयकर विभाग आयुक्त अभिनय कुंभार, अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, शाम देशपांडे (अप्पर विभागीय आयुक्त पुणे.( से. नि.) प्रसिद्ध लेखक, उद्योजक शरद तांदळे उपस्थित असणार असल्याचे डॉ विठ्ठल जाधव यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!