गगन उन्नती (कात्रज) मध्ये प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठेचा जल्लोष
भव्य मिरवणूक, आतिशबाजी आणि दीपोत्सवाने परिसर झाला राममय

कात्रज (प्रतिनिधी) : प्रभू श्री रामांचा जयघोष, उंट, घोडे, डी.जे., बँड, रथ, पुष्पवृष्टी, आतिषबाजी, भक्तांचे नृत्य, हाथी भगवा घेऊन भव्य मिवणुक कडून गगन उन्नतीच्या सदस्यांनी प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठेचा आनंदउत्सव साजरा केला. यावेळी वेशभूषेतील प्रभू रामचंद्राच्या सोबत माता सीता, भ्राता लक्ष्मण आणि श्री हनुमान रथात विराजमान होते. श्री रामांचा जय जयकार, रोषणाई आणि दीपोत्सवाने गगन उन्नतीचा परिसर उकळून निघाला.
भारतीय संस्कृती आणि प्रभूरामांचा इतिहास भावी पिढीला कळावा यासाठी गगन उन्नती मधील कलाकारांनी राम जन्मापासून, त्यांचे गुरुकुल शिक्षण, राम-सीता विवाह, वनवास, केवट, शबरी आणि हनुमानाचा भक्तीमय प्रसंग, सिता हरण, लंका दहन, रामसेतू निर्माण करत, दशानन रावणाचा वध करून प्रभू श्रीरामांचा आयोध्या वापसीचा प्रवास संगीतमय नाट्यातून कलाकारांनी सादर केला. सदर सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
श्रीरामांना 56 भोगाचा नैवेद्य अर्पण करुण, महाआरती व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.