देवदासी महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन
सामाजिक कार्यकर्त्या सुनीताताई भगत व गौरीताई पिंगळे यांच्या पुढाकार

पुणे: दरवर्षीप्रमाणे यंदा देखील समाजामध्ये दुर्लक्षित असणाऱ्या देवदासी महिलांसाठी सामाजिक कार्यकर्त्या सुनीताताई भगत व गौरीताई पिंगळे यांनी या देवदासी महिलासाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यांच्यासोबत संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर सरकारच्या माध्यमातून तर महिला मंडळाच्या माध्यमातून काही पर्याय काढता येईल का? याविषयी चर्चा केली.
यावेळी गौरीताई पिंगळे म्हणाल्या की देवदासी महिला आहेत म्हणून इतर महिला सुरक्षित आहे. आम्ही नेहमी तुमच्या सोबत आहोत, काहीही समस्या आल्या तरी एक महिला या नात्याने विविध संघटना मार्फत आम्ही आपल्या पाठीशी राहू असा विश्वास सुनीताताई यांनी दिला.
समाजामध्ये त्यांना मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी आनंदी प्रतिष्ठानच्या गौरीताई पिंगळे व युवा माळी संघाच्या अध्यक्षा सुनीताताई भगत यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.