पुणेराजकीयविशेषसामाजिक

श्री गणेश जयंतीच्या औचित्याने सिंहगड रोड परिसरातील गणेश मंडळांना भेटी

पुणे: श्री गणेश जयंतीच्या औचित्याने सिंहगड रोड परिसरातील साधारण ५२ गणेश मंडळांना ॲड. प्रसन्नदादा जगताप मित्र परिवाराच्या वतीने भेटी देण्यात आल्या. यावेळी मंडळांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांना भेटी देत मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

बाप्पाचे दर्शन घेत आरती केली सोबतच मंडळातर्फे करण्यात आलेला स्वागतपर सत्कारही स्वीकारला.आपल्या सिंहगड रोड परिसरातील वेगवेगळ्या मंडळांना भेटी देत मिळालेला आनंद आणि सोबतच उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह समाधान देणारा होता. वेळेच्या अभावी सर्व गणेश मंडळांना प्रत्यक्ष भेट देणे शक्य न झाल्यामुळे क्षमस्व. येणाऱ्या काळात आपल्या सर्व मंडळांना भेटी नक्कीच दिल्या जातील.

पुनश्च एकदा सिंहगड परिसरातील सर्व गणेश मंडळांचे ॲड. प्रसन्नदादा जगताप मित्र परिवाराच्या वतीने मनःपूर्वक धन्यवाद !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!