महिला दिनानिमित्त शांतीदूत तर्फे ‘सेवा गौरव पुरस्कार प्रदान सोहळा, मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन
रविवार दि. ३ मार्च रोजी स. १० ते दुपारी ३ पर्यंत कार्यक्रम
पुणे: जागतिक महिला दिनानिमित्त शांतीदूत परिवारातर्फे ‘सेवा गौरव पुरस्कार प्रदान सोहळा २०२४’ तसेच महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन रविवार दिनांक ३ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत युनिटी हॉस्पिटल, औंध येथे करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी शांतीदूत परिवाराच्या संस्थापिका सौ. विद्याताई विठ्ठल जाधव, युनीटी हॉस्पिटलच्या डॉ. प्रिती काळे, राष्ट्रीय अध्यक्षा तृषाली जाधव, IPS डॉ. विठ्ठल जाधव (से. नि.), उद्योजक किसन भोसले, हर्षल गौड पाटील, विजय ठूबे, अभिनेत्री रोहिणी कोळेकर, सुरेश सकपाळ, विजया नागटिलक, मधुकर चौधरी आदी उपस्थित होते.
विशेषत: महिलांचा सहभाग रक्तदानामध्ये वाढावा या उद्देश्याने हे शिबिर आयोजित केले आहे. हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे महिला रक्तदान करु शकत नाहीत. त्यांच्यात या विषयी जागृती व्हावी, हिमोग्लोबिन वाढीसाठी कोणता आहार व औषधे घ्यावीत या विषयी त्यांना तज्ञा कडून मार्गदर्शन देखील करण्यात येणार असल्याचे आयोजक यांनी सांगितले.
त्याच प्रमाणे विविध क्षेत्रातील महिलांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. त्यामध्ये रुग्ण सेवा/वैद्यकिय सेवा, दिव्यांग सेवा, निराधार बालकांची सेवा, शिक्षण सेवा, शासकीय सेवा, कला, क्रीडा, साहित्य क्षेत्रातील योगदान देणाऱ्या महिला व संस्थाचा सहभग आहे. सन्मान चिन्ह, मानपत्र व उपरण अशे या सन्मानाचे स्वरूप आहे.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. भवानी राकेश U.K.(अंतरराष्ट्रीय अध्यक्षा शांतीदूत परिवार) तर प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे, उद्योजिका सुप्रिया बडवे, स्वप्ना गोरे पोलिस उपायुक्त पिंपरी चिंचवड, सौ.सुनीता राजे पवार (संस्कृती प्रकाशन पुणे), भाग्यश्री नवटाके IPS अधिकारी, डॉ. विट्ठल जाधव विशेष पोलिस महानिरीक्षक से. नि. महाराष्ट्र, उद्योजक किसन भोसले, उद्योजक हर्षल गौंड पाटील प्रल्हाद साळुंखे (मुख्य अभियंता MSEB से.नि.), डॉ. वेंकट साई (आंतरराष्ट्रीय सल्लागार शांतीदूत) आदी उपस्थित राहणार आहे.