पुणे शॉपिंग फेस्टिवल सीजन -६ ला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद
Pune- पुणे बिझनेस क्लब ने आयोजित केलेला आणि पर्ली फॅशन स्टोअर ने प्रायोजित केलेला शॉपिंग महोत्सवाची सुरुवात आज शनिवार दिनांक ६ एप्रिल रोजी करण्यात आली. या महोत्सवात पुणेकरांना चांगल्या संधींचा आणि वेगवेगळ्या ऑफर्सचा लाभ घेता येणार आहे.६ आणि ७ एप्रिल रोजी, सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत पुण्यातील, बिबबेवाडी, गंगाधाम चौक जवळ असलेल्या महा ट्रेड मार्केट मध्ये हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
उत्कृष्ट खरेदीचे पर्याय, वाजवी दर, खाऊ गल्लीची रेलचेल असलेल्या तसेच भरपूर ऑफर्स, लकी ड्रॉ आणि छान छान गिफ्ट असलेल्या या प्रदर्शनामध्ये वंडर कार्ड असलेल्या सर्वांना मोफत नेल आर्ट किंवा ब्लो ड्राय, पेप्सिकल, सलाड टेस्टर आणि लहान मुलांसाठी एक गेम पूर्णपणे मोफत मिळत आहे.
‘मिस्सी एन बेबी’ या प्रीमियम स्टोअर मध्ये बंपर लकी ड्रॉ आयोजित केलेला आहे. यामध्ये जिंकणाऱ्या व्यक्तीला सोन्याचे नाणे मिळणार आहे. स्टोअरच्या संस्थापिका बोस्की जैन यांचे प्रदर्शनाला विशेष सहकार्य लाभले आहे. या पुणे खरेदी महोत्सवाला पुनम इव्हेंट्स हे डेकोर पार्टनर तर साई बिझनेस क्लब सपोर्ट पार्टनर आहेत.
या प्रदर्शनाच्या प्रमुख उपस्थितीत पुणे बिझनेस क्लबच्या संचालिका सौ सपना काकडे, डॉ. लकीशा मरलेचा (चेअर पर्सन जीतो लेडीज विंग,पुणे),सिने अभिनेत्री सोनाली खरे, सनाया आनंद, साई बिझिनेस क्लबच्या संचालिका प्रोफेसर डॉ कृती वजीर यांच्या सह अनेकांची विशेष भेट प्रदर्शनाला लाभली.