आर्थिकदेश-विदेशपुणेमहाराष्ट्र

‘इन्व्हेस्को’सोबत भागीदारी करून ‘इन्व्हेस्को इंडिया ॲसेट मॅनेजमेंट लि.’मधील ६० टक्के भागभांडवलाची जबाबदारी घेण्याचे ‘इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग लि.’चे नियोजन

मुंबई, – बँकिंग आणि आर्थिक मालमत्तांमध्ये अनेक गुंतवणूक असलेली मॉरिशसस्थित गुंतवणूक होल्डिंग कंपनी इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्स लिमिटेड (आयआयएचएल) आणि इन्व्हेस्को लि. या कंपन्यांनी एक संयुक्त कंपनी (जेव्ही) उभारण्यासाठी करार केला आहे. या करारानुसार, आयआयएचएल ही कंपनी ‘इन्व्हेस्को ॲसेट मॅनेजमेंट इंडिया लिमिटेड’मधील (आयएएमआय) ६० टक्के समभाग घेणार आहे. ही माहिती या दोन्ही कंपन्यांच्या वतीने आज येथे देण्यात आली.

इन्व्हेस्को लि. या जागतिक गुंतवणूक व्यवस्थापन क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीची आयएएमआय ही भारतीय शाखा आहे. ती १.६ ट्रिलियन डॉलर्सपेक्षा अधिक मूल्याच्या संपत्तीचे व्यवस्थापन करते. आयआयएचएल ही इंडसइंड बँकेची प्रवर्तक संस्था आहे. इंडसइंड बॅंक ही बीएसई व एनएसई या स्टॉक एक्सचेंजेसवर सूचीबद्ध असलेली भारतातील खासगी क्षेत्रातील पाचवी मोठी बँक आहे. ती भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे नियंत्रित केली जाते. नव्याने स्थापन झालेल्या ‘जेव्ही’मध्ये ‘इन्व्हेस्को’चा हिस्सा ४० टक्के असेल.

आयआयएचएल व इन्व्हेस्को या दोघांनाही या ‘जेव्ही’मध्ये प्रायोजकत्वाचा दर्जा असेल. आयएएमआय ही भारतातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी विदेशी मालमत्ता व्यवस्थापक कंपनी असून देशांतर्गत मालमत्ता व्यवस्थापनामध्ये ती १७वी मोठी कंपनी आहे. देशभरातील ४० शहरांमध्ये तिची उपस्थिती आहे. दि. ३१ मार्च २०२४ रोजीच्या आकडेवारीनुसार, तिच्या व्यवस्थापनाखाली ८५३.९३ अब्ज डॉलर्सची मालमत्ता आहे, तसेच ती ऑनशोअर आणि ऑफशोअर सल्लागार म्हणूनही काम करते. आयआयएचएल आणि इन्व्हेस्को या दोन्ही भागीदारांनी आपापली सामर्थ्ये या संयुक्त उपक्रमात एकत्रित आणली आहेत.

‘इन्व्हेस्को’तर्फे जागतिक उत्पादने आणि प्रक्रिया यांचा पोर्टफोलिओ, तर ‘आयआयएचएल’तर्फे भारतभरातील ११ हजाराहून अधिक टच पॉइंट्स आणि ४.५ कोटी ग्राहक यांचे मोठे नेटवर्क या जेव्हीमध्ये सामील होणार आहे. ‘आयआयएचएल’ची स्थापना स्व. एस. पी. हिंदुजा यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली १९९३मध्ये झाली. ही एक गुंतवणूक होल्डिंग कंपनी आहे. मॉरिशसच्या ‘फायनान्शिअल सर्व्हिस कमिशन’ने तिला ग्लोबल बिझनेस लायसेन्स दिलेले आहे. रितसर संचालक मंडळाद्वारे शासित होणाऱ्या या कंपनीच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये बँकिंग सेवा (इंडसइंड बँक, स्टर्लिंग बँक अॅंड ट्रस्ट लि. – बहामाज), भांडवली बाजार मालमत्ता (आफ्रिनेक्स एक्सचेंज लि., मॉरिशस, १३.५ अब्ज डॉलर्सच्या अंतर्निहित सिक्युरिटीजची एकत्रित सूची) आणि विशेष स्वरुपाच्या वेल्थ मॅनेजमेंट सर्व्हिसेस (बेरिलस कॅपिटल-यूके, स्वित्झर्लंड व सिंगापूर) यांचा समावेश आहे.

रिलायन्स कॅपिटल लि. ही कंपनी आणि आयुर्विमा, आरोग्यविमा, इतर विमा, मालमत्ता पुनर्रचना, संशोधन आणि सिक्युरिटीज ब्रोकिंग या क्षेत्रातील तिच्या उपकंपन्या यांच्या अधिग्रहणासाठी ‘आयआयएचएल’ने बोली लावली होती, तिला ‘एनसीएलटी’ने नुकतीच मंजुरी दिली आहे. या रिझोल्यूशन प्लॅनची अंमलबजावणी पूर्ण होण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!