‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ हा कॉमेडी शो हास्याचा आणखी एक जबरदस्त डोस
‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ मध्ये आपल्या वडीलांविषयी बोलताना हुमा कुरेशी म्हणाली, “आज मी जी कुणी आहे ती त्यांच्यामुळे आणि त्यांनी केलेल्या त्यागामुळेच आहे” या शनिवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ हा कॉमेडी शो हास्याचा आणखी एक जबरदस्त डोस घेऊन येत आहे, ज्यामध्ये कॉमेडी आणि काव्य यांचे बेमालूम मिश्रण असेल.
शोच्या या ‘मुशायरा स्पेशल’ भागात येणार आहेत प्रख्यात कवी आणि अभिनेता शैलेश लोढा आणि त्यांच्यासोबत असतील गौरव मोरे, सृष्टी रोडे आणि सुगंधा मिश्रा. या शोमधले विनोदवीर आपल्या धमाल परफॉर्मन्सेसने मॅडनेस की मालकीन हुमा कुरेशीला आणि पाहुण्यांना खूप हसवतील, तर शैलेश लोढा एक पिता आणि त्याची मुलगी यांच्यातील हृद्य नात्याचे चित्रण करणाऱ्या हृदयस्पर्शी कविता सादर करेल. त्या कवितेच्या शब्दांनी सर्व प्रेक्षकांबरोबरच स्वतः मॅडनेस की मालकीन हुमा कुरेशी देखील भावुक झालेली दिसेल. त्यानंतर हुमा कुरेशी आपले वडील सलीम कुरेशी यांच्याविषयी बोलताना दिसेल.
हुमा म्हणते, “तू (शैलेश लोढा) जेव्हा पिता-पुत्रीच्या नात्यावरची ही हृदयस्पर्शी कविता सादर करत होतास, तेव्हा मला माझ्या वडीलांची खूपच आठवण येत होती. मला आठवते आहे, ते रेस्टॉरंटच्या व्यवसायात असल्याने प्रत्येक सणाच्या दिवशी ते काम करत असत, कारण सुट्टीच्या दिवशी रेस्टॉरंटमध्ये जास्त गर्दी होत असे. ते आम्हाला वेळ देत नाहीत, म्हणून लहान असताना मी त्यांच्याशी वाद घालत असे. पण आता मला ही गोष्ट समजते आहे की, आमच्यासोबत न घालवलेला वेळ कीती महत्त्वपूर्ण होता, कारण आज मी जी कुणी आहे, ती त्यांच्यामुळे आणि त्यांनी केलेल्या त्यागामुळेच आहे.
तुझी कविता ऐकून माझे मन भरून आले. धन्यवाद!” या वीकएंडला बघायला विसरू नका, ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ रात्री 9:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!