पुणेमहाराष्ट्रसामाजिक

सामाजिक उपक्रमांच्या निधी उभारणीसाठी सीएसआर हेल्पलाईनचा शुभारंभ

सोशल रिस्पॉन्सिबीलिटी समूहाचा नावीन्यपूर्ण उपक्रम

पुणे : सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांचे सक्षमीकरण व्हावे, याउद्देशाने पुण्यात सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूहाच्या पुढाकाराने सीएसआर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. अनेक सामाजिक संस्था उपक्रम राबवितात. मात्र, त्यांना निधीची कमतरता असते. त्यामुळे या कार्यशाळेद्वारे त्याबद्दल मार्गदर्शन व निधी उभारणीसाठी सीएसआर हेल्पलाइनचा शुभारंभ देखील शनिवार, दिनांक १८ मे रोजी फर्ग्युसन महाविद्यालयातील सी ६ केमेस्ट्री हॉल येथे दुपारी ४ वाजता आयोजित कार्यशाळेत होणार आहे, अशी माहिती सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूहाचे संस्थापक अध्यक्ष विजय वरुडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला अनिल नाईक, चेतन मराठे, सागर पाटील, पौर्णिमा कुलकर्णी, सारिका साठे, आदी उपस्थित होते. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूह, फर्ग्युसन महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय कर्तव्य अभियान महाराष्ट्र अंतर्गत या सीएसआर कार्यशाळा व प्रकल्प संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशन मुंबईचे सहा. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीपसिंग बयास, बॉश इंडिया फाऊंडेशनचे सीएसआर प्रकल्प व्यवस्थापक सूरज जाधव, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे प्रकल्प व्यवस्थापक अभय देशपांडे, इंडिया सीएसआरचे कौशल्य सल्लागार डॉ.संजय गांधी, डॉ.आशिष पोलकडे, बाळासाहेब झरेकर, डॉ.दयानंद सोनसाळे, अभय भंडारी आदी उपस्थित राहणार आहेत.

विजय वरुडकर म्हणाले, सीएसआर निधी उभारणीसाठी आवश्यक पूर्व तयारी, कायदेशीर प्रक्रिया, प्रकल्प लिखाण, प्रकल्प अंमलबजावणीसाठी महत्वाचे मुद्दे, हेल्पलाईनद्वारे नोंदणी प्रक्रिया व निधी उभारणीसाठी सहकार्य यांसह विविध विषयांवर कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. वैयक्तिक दान दाता समूह, क्राऊड फंडिंग व्यासपीठ, अनिवासी भारतीय द्वारा निधी उभारणी व्यासपीठ, सामाजिक उद्योजकतेसाठी गुंतवणूकदार व्यासपीठ, शासकिय योजनांची समुपदेशन यंत्रणा अशा प्रकारच्या विषयांची माहितीही यावेळी देण्यात येणार आहे.

राज्याच्या विविध भागांतून येणा-यांना या कार्यशाळेला मोफत प्रवेश असून ८४४६००४५८० / ९५४५२८८२८० या क्रमांकावर नोंदणीसाठी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!