Pune: देशात लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा लवकरच संपणार आहे. लोकसभा निवडणूकीत भाजपा 400 पारच्या घोषणा करत आहे. मात्र भाजपचा हा विजयी संकल्प आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल Aravind Kejriwal यांच्या जेल मधून बाहेर येण्याने अवघड असेल असे मत इंडिया अगेन्स्ट करप्शन चे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी आज व्यक्त केले.
पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात आपचे नेते अरविंद केजरीवाल यांना इडीने अटक केली होती. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत झालेल्या या कारवाईने खळबळ माजली होती. मद्य धोरणात खरेच काही घोटाला आहे का? या विषयी अनेकांच्या मनात साशंकता आहे, इडी ने केलेली कारवाई घाईघाईत झाल्याचे किंबहुना चुकीची झाल्याचे अनेकांचे मत आहे.
केजरीवाल तिहार तुरुंगातून बाहेर यावेत यासाठी अनेक पक्ष, नेते प्रयत्नशील होते. त्यांना जामीन मिळणार की नाही यावरही मोठ्या चर्चा झडल्या आहेत. आज केजरीवाल जेलमधून बाहेर आले आहेत, त्यांना सामान्य जनतेची सहानुभूति मिळेल असे चित्र सध्या सर्वत्र दिसत आहे. या सहानुभूतीमुळे भाजपच्या जागा कमी होतील नवी दिल्ली, पंजाब मध्ये आम आदमी पक्षाची ताकद मोठी आहे, यामुळे भाजपा ला केजरीवाल जेल मधून येण्याचा मोठा फटका बसेल असे पाटील यांनी म्हटले आहे.