जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटचा इयत्ता १२ वी चा निकाल १०० टक्के
योगिता मोरे, ऋचा कट्टे, प्रणव माने, वेदांत पाठक, भक्ती कदम, रसिका ननावरे, हर्षल फाकटकर यांची बाजी
पुणे : न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस्च्या शार्दुल सुधाकरराव जाधवर कॉमर्स अँड सायन्स ज्युनियर कॉलेज, जाधवर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज, पॅराडाईज इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या १२ वी चा निकाल १०० टक्के लागला आहे. ऋचा कट्टे, आदिती पवार, अनिश शाह, प्रणव माने, निकिता भिकुले, कादंबरी तिकोने, योगिता मोरे संवादी दाधी, आयुष मुत्तेपवार, वेदांत पाठक, हर्षल फाकटकर, तनिष्का दळवी, भक्ती कदम, उर्मिला सूर्यवंशी, नंदिनी साळुंखे, रसिका ननावरे, कुंदा वायकर, अनिता सुतार यांनी १२ वीच्या परीक्षेत यश मिळवले आहे. यंदा देखील मुलींनी मोठया प्रमाणात बाजी मारली आहे.
जाधवर ग्रुपचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष अॅड.शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर यांसह सर्व प्राचार्य, शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
शार्दुल सुधाकरराव जाधवर कॉमर्स अँड सायन्स ज्युनियर कॉलेजच्या विज्ञान शाखेत योगिता मोरे (८९.३३ टक्के), जाधवर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये सायन्स शाखेत ऋचा कट्टे (८६ टक्के) आणि वाणिज्य इंग्रजी माध्यमात प्रणव माने (७८.६७ टक्के) यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
तर, पॅराडाईज इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या विज्ञान शाखेचा वेदांत पाठक (८८.५० टक्के), वाणिज्य मराठी माध्यम मध्ये भक्ती कदम (८०.१७ टक्के) व कला शाखेत रसिका ननावरे (७८.५० टक्के) यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे.