पुणेमहाराष्ट्रशैक्षणिक

सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

सूर्यदत्त'चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांच्याकडून विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे. सूर्यदत्त कनिष्ठ महाविद्यालय आणि सूर्यदत्त पब्लिक स्कुलचा निकाल १०० टक्के लागला आहे. कला, वाणिज्य, विज्ञान, एमसीव्हीसी व बायफोकल अशा सर्वच शाखेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत शाळेसाठी अभिमानास्पद कामगिरी केली.

विज्ञान आणि एमसीव्हीसीच्या विद्यार्थ्यांनी १०० टक्के निकालासह, वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी ९७ टक्के आणि कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी ९६ टक्के गुण मिळवून प्रथम स्थान पटकावले.सूर्यदत्त पब्लिक स्कूलच्या विज्ञान शाखेतील अरिव लालम मांडवकर व दित्या महेश पाटील यांनी ९२.६७ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकवला. कनक प्रतीक अग्रवाल (९२.५० टक्के), अथर्व सुनीत राणे (९२ टक्के) यांनी द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे.

वाणिज्य शाखेतील रोहन राजाराम क्षीरसागर (९१.६७ टक्के), अन्वी रोहित तायल (९०.८३ टक्के) आणि प्रांजल पंकज तुरंग (८९.८३ टक्के), तर कला शाखेतील इशिका मनीष वार्ष्णेयने ८८ टक्के, सावनी अमित कांतकने ८७ टक्के, तर जुई अतुल देशपांडे हिने ८५.५० टक्के गुण मिळवत यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकवला आहे.

सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेजच्या विज्ञान शाखेत आहान विशाल नांदीमठ (९१.८३ टक्के), कपिल राहुल मुळ्ये (८८.१७ टक्के), अनिष परेश अवचट (८६.८३ टक्के), वाणिज्य शाखेत दिया मंगेश राजाध्यक्ष (९४.१७ टक्के), जिया रणजित कदम (८७.१७ टक्के), प्रथमेश दीपक शिंदे (७८.५० टक्के), तर कला शाखेत रिया अमित चौधरी (८४.८३ टक्के), यश अमित पुंडे (८४.३३ टक्के), इशिका मनीष अग्रवाल (८४ टक्के), तर व्यावसायिक अभ्यासक्रमातून (एमसीव्हीसी) देविका मंगेश कसुरंग (६७.६७ टक्के), पूर्णा गुरुप्रसाद कुलकर्णी (६६.३३ टक्के), आणि केदार मंदार जोग (६० टक्के) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकवला आहे.

सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्ष सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्ष स्नेहल नवलखा, प्राचार्या किरण राव आणि मुख्याध्यापिका वंदना पांडे यांच्यासह सर्वांनीच विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय निकालाबद्दल अभिनंदन केले. प्राचार्यांसह सर्व शिक्षकांच्या प्रयत्नांचे हे फळ असून, कामगिरीतील स्थिर सुधारणा हा समाधानाची गोष्ट असल्याचे सर्वांनीच नमूद केले. लवकरच विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि पदके देऊन सन्मानित केले जाईल, असे सुषमा चोरडिया यांनी सांगितले.

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “कठोर परिश्रम, समर्पण आणि दृढनिश्चय नेहमीच मोठ्या प्रमाणात फलदायी ठरतो. प्रत्येक विद्यार्थ्याने त्यांच्या पालकांच्या आणि शिक्षकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. नवीन शैक्षणिक धोरणानुसार सूर्यदत्तने सर्व शाखांमधील विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रातील बदलत्या कलांशी अद्ययावत राहण्यासाठी प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे ते अधिक स्पर्धात्मक होतील आणि उच्च व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये सहभागी होतील.

शैक्षणिक उपक्रमासह ‘सूर्यदत्त’च्या शाळा मूल्यवर्धित उपक्रम, मार्गदर्शन सत्रे, कार्यशाळा, वक्तृत्व, निबंध लेखन, नाट्यस्पर्धांचे आयोजन करते. विद्यार्थ्यांना आत्मविश्वास आणि देशभक्तीची भावना यातून मिळते. जागतिक बाजारपेठेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल, यावर ‘सूर्यदत्त’चा भर आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!