अशोक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९९ टक्के
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या बारावीच्या निकालात महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळ संचलित अशोक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा (कला, वाणिज्य व विज्ञान) निकाल ९९ टक्के लागला असून, उल्लेखनीय निकालाची परंपरा याही वर्षी कायम राखली आहे. या यशामध्ये सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्था व्यवस्थापन सर्वांचे योगदान मोलाचे राहिले.
विज्ञान शाखेत ऋचा मंदार रानडे (९३.६७ टक्के), ऋतुपर्ण मंदार रानडे (९३.५० टक्के), वरद विनय मोघे व श्रवण नरेंद्र खंडागळे (९२.१७ टक्के) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला.ऋचा व ऋतुपर्ण रानडे या दोघांनाही विज्ञान शाखेत गणितामध्ये १०० पैकी १०० गुण मिळाले.
कला शाखेत ऋषिका शिवानी डोईफोडे (८३.६७ टक्के) श्रेया धनंजय तबिब (७७ टक्के), आशिष दीपक म्हापसेकर (७६.८३ टक्के) यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाला. वाणिज्य शाखेत आर्या अभय देशपांडे (७९.३३ टक्के), स्मित विनोद बुडके (७८ टक्के) व वेदांत चनमलप्पा वाळे (७४.१७ टक्के) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला.
अनुश्री केंदळे हिला माहिती तंत्रज्ञान विषयात १०० पैकी १००, तर ऋचा रानडे व ऋतुपर्ण रानडे यांना संगणक शास्त्रात अनुक्रमे १९३ व १७३ गुण मिळाले आहेत. महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे अध्यक्ष मोहनदादा जोशी, सचिव प्रसाद आबनावे, खजिनदार प्रथमेश आबनावे, सहसचिव पुष्कर आबनावे, सदस्य प्रज्योत आबनावे, गौरव आबनावे, प्राचार्य उर्मिला भोसले, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रभारी रेखा दराडे यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरवपूर्ण उल्लेख करत सर्वांचे अभिनंदन केले.