स्मृतीवन गणपती माथा वनविभाग येथे ११० झाडांचे रोपण
महा एनजीओ फेडरेशन आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने उपक्रमाचे आयोजन
पुणे : निसर्गाने दिलेल्या देणगीचा सन्मान आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी महा एनजीओ फेडरेशनच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वारजे येथील स्मृतीवन गणपती माथा वनविभाग येथे ११० झाडांचे रोपण करण्यात आले.महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक आणि महाराष्ट्र गो सेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महा एनजीओ फेडरेशन आणि आर्ट ऑफ लिव्हिंग ऑर्गनायझेशन मयूरेश्वर सातारा रोड दक्षिण विभाग पुणेच्या वतीने वारजे स्मृतीवन गणपती माथा वनविभाग येथे ११० झाडांचे रोपण करण्यात आले.
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या तृप्ती रणधीर, प्रांजल पंडीत, प्रणिता जगताप, श्रीमंत तांदूळकर आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे ३० स्वयंसेवक व महा एनजीओ फेडरेशनचे वरिष्ठ संचालक मुकुंद शिंदे, संचालक अमोल उंबरजे उपस्थित होते. किशोर मोहोळकर यांनी उपक्रमासाठी सहकार्य केले.
शेखर मुंदडा म्हणाले, निसर्गाच्या सुदृढतेवर मानवी जीवनाची उत्पत्ती आणि उत्क्रांती अवलंबून असल्यामुळे अधिकाधिक झाडे लावा आणि जगवा. पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे, यासाठी पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपण करण्यात आले.